छत्रपती संभाजीनगर
Trending

सह आयुक्त संगिता चव्हाण यांच्या कॅबिनला बाहेरून कडी लावली ! मी पुन्हा येईन म्हणून धमकावले व हुज्जत घालून कार्यालय दणाणून सोडले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – सह आयुक्त संगिता चव्हाण यांच्या कॅबिनला बाहेरून कडी लावून कर्मचार्यांशी हुज्जत घालून आरडा ओरड करून कार्यालय दणाणून सोडले. मी पुन्हा येईन अशी धमकीही दिली आणि पुन्हा आल्यावर कर्मचार्यांनी पोलिसांना बोलावले गोंधळ घालणार्या व्यक्तीस पोलिसांच्या हवाली केले. हा धक्कादाय प्रकार अनुसुचित जमाती तपासणी प्रमाणपत्र समिती सिडको येथे घडला. रमेश त्रिंबक बावस्कर (वय 42 वर्षे रा. एकतानगर हर्सूल) असे आरोपीचे नाव आहे. मला मॅडमला भेटायचे आहे. मॅडम सुनावणी घेत आहे. तुम्ही थोडा वेळ थांबा, असे शिपायाने सांगितल्यानंतर हा प्रकार झाला.

विनोद भीमराव घेवंदे (वय 39 वर्षे, प्रशासकीय अधिकारी, अनुसुचित जमाती तपासणी प्रमाणपत्र समिती सिडको एन-2 छत्रपती संभाजीनगर) हे पाच वर्षांपासून अनुसुचित जमाती तपासणी प्रमाणपत्र समिती येथे नेमणुकीस आहेत. प्रशासकीय अधिकारी विनोद घेवंदे यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, रमेश त्रिंबक बावस्कर (वय 42 वर्षे रा. एकतानगर हर्सूल) हे कार्यालयात इतर जणांचे जात पडताळणी प्रकरणाच्या संदर्भाने नेहमी येत-जात असतात. रमेश बावस्कर यांच्याकडून कार्यालयातील कर्मचार्यांना विनाकारण त्रास होत असल्याने त्यांचे विरुध्द कार्यालयातून वेळोवेळी पत्र व्यवहार करण्यात आला आहे.

दि. 21/07/2023 रोजी दुपारी 1.00 वाजेच्या सुमारास प्रशासकीय अधिकारी विनोद घेवंदे व कार्यालयातील शिपाई नवेरकर, कनिष्ठ लिपीक-बिराजदार, उप संचालक- जाधव हजर असताना रमेश बावस्कर हे कार्यालयात आले व शिपाई नवेरकर यांना म्हणाले की, मला सह आयुक्त संगिता चव्हाण मॅडमला भेटायचे आहे. नवेरकर यांनी त्यांना आतमध्ये संगिता चव्हाण मॅडम उपस्थित असून सुनावणी चालू आहे. तुम्ही त्यांना थोड्या वेळाने भेटा असे, म्हणाले. त्यावेळी त्यांनी मी संघटनेचा अध्यक्ष आहे, असे म्हणून शिपाई यांच्याशी दमदाटी केली.

यावेळी प्रशासकीय अधिकारी विनोद घेवंदे यांनी व अन्य कर्मचार्यांनी रमेश बावस्कर यांची समजुत घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अरेरावीची भाषा करून हुज्जत घातली. सह आयुक्त संगिता चव्हाण मॅडम यांच्या केबिनमध्ये बळजबरी घुसण्याचा प्रयत्न केला. प्रशासकीय अधिकारी विनोद घेवंदे यांनी व अन्य कर्मचार्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हातापायी करून मॅडमच्या केबिनची कडी बाहेरून लावून घेतली. त्यानंतर जोर जोराने आरडा ओरड केला. मी पुन्हा दुपारी 03.00 वाजता येतो व तुम्हाला सगळ्यांना बघून घेतो अशी धमकी देवून ते तेथून निघून गेले.

पुन्हा दुपारी 03.30 वाजेच्या सुमारास आले असता प्रशासकीय अधिकारी विनोद घेवंदे यांनी व कार्यालयातील कर्मचार्यांनी त्याची समजुत घालून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही होवू शकते असे त्यांना सांगितले. यावर त्यांनी, माझ्यावर बारा केसेस दाखल आहे, पोलीस माझे काही करु शकत नाही, असे धमकविण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रशासकीय अधिकारी विनोद घेवंदे यांनी 112 वर कॉल केला असता पोलिस त्याठीकाणी आले असता ते तेथून पळून जाण्याच्या प्रतत्नात असताना कार्यालयातील कर्मचार्यांनी व सिडको पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी त्यांना पकडून पोलीस स्टेशनला घेवून आले.

याप्रकरणी प्रशासकीय अधिकारी विनोद घेवंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश बावस्कर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!