वैजापूर
Trending

वैजापूरमधील लक्ष्मी लॉजवरील कुंटणखान्यावर पोलिसांची छापेमारी ! रुम नंबर २०१ मध्ये डमी ग्राहकाने इशारा करताच पोलिस पथक धडकेले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – वैजापूर शहरातील लक्ष्मी लॉजवर छापा टाकून पोलिसांनी कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. या लॉजवर लॉज चालक मालक व मॅनेजर मिळून आले. पोलिसांनी रुम नंबर २०१ मधील पीडित महिलेची सुटका केली. दि. 11/09/23 रोजी दुपारी 15.40 वाजता महाराणा प्रताप चौक वैजापूर येथील लक्ष्मी लॉजच्या पहिल्या मजल्यावर रूम क्रमांक 201 मध्ये छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली.

विष्णू भीमराव जेजुरकर (वय 73 वर्षे, धंदा लॉज चालक मालक, राहणार महाराणा प्रताप रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर),  मच्छिंद्र विनायक जगदाळे (वय 43 वर्षे धंदा नोकरी मॅनेजर राहणार बेलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिस निरीक्षक आरती शेषराव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरन 493/2023 कलम 3,4,5 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 प्रमाणे वैजापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैजापूर शहरातील महाराणा चौकातील लक्ष्मी लॉज याठिकाणी लॉज मालक व मॅनेजर हे स्वत:चे आर्थिक फायद्या करिता महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या अनुषंगाने मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक व सपोनि आरती जाधव अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथक (AHTU) यांच्या पथकांने दिनांक 11/9/2023 रोजी दुपारी ३ ते ३.४० वाजेच्या सुमारास लक्ष्मी लॉज परिसरात सापळा लावला.

एका डमी ग्राहकांस लक्ष्मी लॉज येथे पाठवले. तेथे लॉज मॅनेजर मच्छिंद्र विनायक जगदाळे यांना डमी ग्राहक भेटला. लॉज मालकाने त्या डमी ग्राहकाला पहिल्या मजल्यावरिल रूम नं 201 मध्ये जाण्यास सांगितले. तेथे मॅनेजर एक महिलेला घेवून आला. याच दरम्यान डमी ग्राहकांने पोलिसांना इशारा करून बोलावून घेतले. पोलिस पथकाने छापा मारून पीडित महिलेची सुटका केली.

आरोपी मच्छिंद्र विनायक जगदाळे यांच्या पॅन्टच्या खिशातून 500 रुपये दराचा 20 नोटा 200 रुपये दराची एक नोट एकूण 10200 रुपये रोख रक्कम व शर्टच्या जवळच्या खिशात 500 रुपये दराची एक GH 092960असा नंबर असलेली बनावट ग्राहकाने दिलेली एक नोट आणि एक रियल मी कंपनीचा फिकट जांभळ्या रंगाचा जुना वापरता मोबाईल अंदाजे किंमत 10,000 मिळून आले.

पीडित महिलेच्या ताब्यातून 500रुपये दराची 05 नोट 200रुपये दराची 04 नोट 100रुपये दराच्या06 नोट 50रुपये दराच्या 03 नोटा 20 रुपये दराची 01 नोट एक लावा कंपनीचा निळ्या रंगाचा जुना वापरता मोबाईल किंमत 1000रुपये एक रेडमी कंपनीचा लाल रंगाचा जुना वापरता मोबाईल अंदाजे किंमत 10000रुपये आदी एकूण 36490 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

Back to top button
error: Content is protected !!