वैजापूर
Trending

वैजापूर तालुक्यात सावत्र आईचा विळ्याने गळ्यावर वार करून खून ! शेतीच्या वादातून संतापजनक घटना, संपूर्ण वैजापूर तालुका हादरला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १ – मला तुमच्या जवळील अर्धा एकर शेतजमीन द्या असे म्हणून शेतीच्या वादातून सावत्र आईचा लोखंडी विळ्याने गळ्यावर वार करून खून केल्याची खळबळजनक घटना वैजापूर तालुक्यात घडली. ही घटना गट नंबर ८५, आगर सायगांव शिवारात (ता. वैजापूर) येथे आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

आशाबाई घमाजी जाधव (वय 48 वर्षे, राहणार अगर सायगाव शिवार, ता. वैजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय घमाजी जाधव (वय २१, व्यवसाय शेती, रा. आगर सायगाव शिवार, ता. वैजापूर, जि. संभाजीनगर) याने दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिसांनी नानासाबेब घमाजी जाधव (रा. आगर सायगाव शिवार, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.

यासंदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, नानासाहेब यांचा आपल्या सावत्र आई आशाबाई यांच्याशी शेतीवरून वाद सुरु होता. हा वाद आज विकोपाला गेला. आज, शनिवार १ जुलै रोजी सकाळी ११.३० ते १२ वाजे दरम्यान नानासाहेबाने सावत्र आई आशाबाईवर विळ्याने वार केला. गळ्यावर व चेहऱ्यावर वार केल्याने आशाबाईंचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोक जमू लागले.

लोकांना पाहून आरोपी नानासाहेब याने विहिरीत ऊडी घेवून जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याला बाहेर काढत घटनेची माहिती तातडीने वैजापूर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधिकारी महक स्वामी, पोनि लोकरे, पोउपनि पाटील, पोउपनि शेख यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविचछेदनासाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास पोनी लोकरे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!