छत्रपती संभाजीनगरवैजापूर
Trending

वैजापूर: झोलेगाव ग्रामपंचायत सदस्य अजय शिवाजी काकडे यांना अपात्र ठरवले ! ग्रामपंचायत अभिलेखात खाडाखोड, अतिक्रमण भोवले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – वैजापूरच्या तहसीलदारांनी दिलेला अहवाल व परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या अभिलेखात खाडाखोड करून सरकारी चावडी व सहान जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी अजय शिवाजी काकडे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व तात्काळ प्रभावाने अपात्र ठरवले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिलेल्या आदेशाला न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती अजय काकडे यांनी संभाजीनगर लाईव्हला दिली.

अर्जदार वसंत कारभारी काकडे (रा. झोलेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर यांनी दाखल केलेला विवाद अर्ज क्र. १८९/२०२१ हा मंजूर करण्यात आला होता. गैरअर्जदार क्रं. १ अजय शिवाजी काकडे (रा. झोलेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर) यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम कलम १४ (१) (ज-३) आणि १६ अन्वये ग्रामपंचायत झोलेगाव ता. वैजापूर चे सदस्य पदावरून तात्काळ प्रभावाने अपात्र ठरविण्यात आले असून सदरचे पद जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डये यांनी रिक्त घोषीत केले आहे.

गैरअर्जदार क्रं. १ त्यांचे वडील व आजोबा सीताहारी शिवराम काकडे हे एकत्रीत कुटुंबातील सदस्य असल्याने, गैरअर्जदार क्रं. १ यांचे वडील व आजोबा यांच्या ग्रामपंचायत अभिलेखामध्ये अनाधिकृतपणे फेरवदल करून मिळकत .क्रं. ६२ या सरकारी चावडीचे क्षेत्र मिळकत क्रं. ६३ या सीताहारी शिवराम यांच्या नावे असलेल्या मिळकतीमध्ये समाविष्ट करून त्या ठिकाणी घराचे बांधकाम करून व सहान जागेवर अनाधिकृत ताबा करून अतिक्रमण केल्याची बाब स्पष्ट होत असल्याने, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम कलम १४ (१) (ज-३) मधील तरतुदीनुसार व सर्वोच्च न्यायालयाने जनाबाई राठोड विरुद्ध अपर आयुक्त अमरावती या प्रकरणात घालून दिलेली न्यायतत्व विचारात घेता, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी आदेश परीत केले आहे.

तहसिलदार वैजापूर यांनी दिनांक ११.०४.२०२२ च्या अहवालाद्वारे हे स्पष्ट केले आहे की, सीताहारी शिवराम काकडे यांनी ग्रामपंचायत झोलेगाव हद्दीतील सरकारी चावडी सहान जागेवर अतिक्रमण केले असल्याचे स्पष्ट होते व सीताहारी शिवराम काकडे हे ग्रामपंचायत सदस्य अजय काकडे यांचे आजोबा आहेत.

असा आहे संपूर्ण न्यायनिर्णय (अर्जदार, गैरअर्जदार यांचा युक्तीवाद याशिवाय तहसीलदारांचा अहवाल वाचा सविस्तर आदेश खालीलप्रमाणे) –

१) प्रस्तुत विवाद अर्ज अर्जदार वसंत कारभारी काकडे, रा. झोलेगाव, ता. वैजापूर यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ (१) (ज-३) मधील तरतुदीनुसार दाखल केला
असून, प्रस्तुत विवाद अर्जाद्वारे अर्जदार यांनी निवेदन केले आहे की,

(अ) अर्जदार हे मौजे झोलेगाव ता. वैजापूर येथील रहिवासी असून डिसेंबर २०२० मध्ये झोलेगाव ग्रामपंचायतीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये गैरअर्जदार क्रं. १ वार्ड क्रं. ३ मधून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निर्वाचीत झालेले आहेत.

आ) तक्रार अर्जात नमूद सरकारी चावडी सहान जागा या मालमत्तेची ग्रामपंचायत मालमत्ता रजिस्टर न.नं. ८ घर नोंद सन १९८६-८७ मे १९८७-८८ या वर्षापर्यंत असल्याचे दिसून येते. तिचा मिळकत क्रं. ६२ असा असल्याचे दिसून येते परंतू सन १९८८-८९ च्या रजिस्टर वर सहान जागा / चावडीची नोंद नसल्याचे दिसून येते तसेच शिवाजी सीताहारी काकडे यांचे नावे असलेल्या मालमत्तेची नोंद ही सीताहारी शिवराम काकडे अशी करण्यात आलेली आहे. सदरील नोंद कशाच्या आधारे करण्यात आली. कोणता मासिक सभा दिनांक, ठराव क्रमांक किंवा फेरफार आधारे केले याबाबत नमुना नंबर ८ (आठ) वर कसल्याही प्रकारची नोंद नाही.

इ) सन २०००-२००१ या वर्षापासून ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तेच्या नोंदी हया शासन निर्णयानुसार क्षेत्रफळानुसार केलेल्या आहेत त्यानुसार सीताहारी शिवराम यांचे नावे मिळकत लाकूड, सिमेंट, वीट मकान २१ x ३१ चौरस फुट व सहान जागा ३१ x ४५ चौरस फुट अशी घेण्यात आलेली आहे. मालमत्ता रजिस्टर नमुना नं. ८ वर सरकारी चावडी या जागेची नोंद नसल्याचे दिसून येते. तसेच या पुढील रजिस्टर मध्ये सरकारी चावडी या जागेची नोंद मालमत्ता रजिस्टर वर दिसून येत नाही.

ई) चौकशीच्या वेळी पंचनामा करण्यासाठी समीती गेली असता त्या ठिकाणी वादीकडील २५ ते ३० व्यक्ती व प्रतिवादी कडील २५ ते ३० व्यक्ती असे एकूण ६०, ७० ग्रामस्थांचा जमाव जमलेला होता. नमुना नंबर ८ वर सीताहारी शिवराम यांचे नावे नोंद असलेल्या मालमत्तेचा पंचनामा केला असता, त्यांच्या नावे असलेले आर.सी.सी. बांधकामाचे क्षेत्रफळ हे २१.५ X ३४ चौरस फुट इतके भरले. तसेच त्यांच्या घरा शेजारील असलेले आर. सी. सी. बांधकाम हे त्यांनी माझे नसल्याचे सांगितले. सदरील बांधकाम कोणी केले त्यासाठी बांधकाम परवाना घेण्यात आला किंवा कसे ? याबाबतचे अभिलेख ग्रामपंचायतला दप्तरी उपलब्ध नाही.

उ) ग्रामपंचायत मालमत्ता रजिस्टर नमुना नंबर ८ वर सीताहारी शिवराम यांचे नाव आर.सी.सी. बांधकामा व्यतिरीक्त सहान जागेची नोंद आहे. सदरील सहान कलम १४ (१) (ज-३) नुसार ग्रामपंचायत सदस्य पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे अशी विनंती अर्जदाराने केलेली आहे.

२) विवाद अर्जासोबत अर्जदाराने, गैरअर्जदार क्रं. १ यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राची प्रत, सन १९८६ ते सन १९८७ या वर्षातील ग्रामपंचायत मिळकत क्रं. ६२ व ६३ चे नमुना नं. ८ च्या उता-याची प्रत, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेले आहेत.

३) प्रस्तुतचा विवाद अर्ज दाखल झाल्यानंतर प्रकरणातील गैरअर्जदार यांना सुणावनीची नोटीस बजावण्यात आली. तसेच अर्जदाराने विवाद अर्जामध्ये प्रस्तुत केलेल्या मुद्याच्या ‘ अनुषंगाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून व ग्रामपंचायत अभिलेखाची तपासणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश गट विकास अधिकारी पंचायत समिती वैजापूर व तहसिलदार वैजापूर यांना देण्यात आले.

४) गटविकास अधिकारी वैजापुर यांचा अहवाल दिनांक २३/१०/२०२१ :-
गटविकास अधिकारी पंचायत समिती वैजापूर यांनी दिनांक २३/१०/२०२१ रोजी या कार्यालयात अहवाल सादर करून कळवले आहे की, ग्रामपंचायत झोलेगाव ता. वैजापूर येथील सरकारी चावडी / सहान जागा आपल्या नावावर करून घेऊन त्यावर अतिक्रमण केल्या संबंधी तक्रार अर्जाचे अनुषंगाने संबंधिताचे जबाब, उपलब्ध अभिलेख पाहणी व स्थळ पाहणी पंचनाम्यानुसार खालील प्रमाणे निष्कर्ष काढण्यात येत आहे.

अ) अजय शिवाजी काकडे हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून माहे जानेवारी २०२१ पासून काम करीत आहेत. ग्रामपंचायत मालमत्ता रजिस्टर नमुना नं. ८ वर त्यांच्या स्वतःचे मालकीचे मालमत्ता घर / सहान जागा असल्याबाबत नोंद नाही. परंतू त्यांचे आजोबा (मयत) सीताहारी शिवराम काकडे यांचे नावे मिळकत क्रं. ७३ वर आर.सी.सी. बांधकाम मकान ३१ x २१ चौरस फुट व सहान जागा ४५ X ३१ चौरस फुट अशा नोंदी आहेत. ग्रामपंचायत सदस्य यांनी त्यांचे वडील शिवाजी सीताहारी काकडे यांचा काहीही संबंध नसून मी निवडणूकी पासून भाडे करारनामा करून विभक्त राहत असल्याचा उल्लेख केलेला आहे परंतू कुटुंबापासून विभक्त राहत असल्याबाबतचे पुरावे सादर केलेले नाहीत.

आ) गैरअर्जदार क्र.१ यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रामध्ये त्यांनी कोणत्याही सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले नसल्याबाबत खोटी माहिती दिलेली आहे. वास्तविक पाहता गैरअर्जदाराचे वडील  शिवाजी सीताहरी काकडे सदर गैरअर्जदार कुटुंबाचे कर्ते असून त्यांनी गावठान जमिनीवर अनाधिकृतपणे अतिक्रमण करून घराचे बांधकाम केलेले आहे.

इ) ग्रामपंचायत नमुना नं. ८ मधील नोदीनुसार सन १९८६-१९८७ पर्यंत मिळकत क्रं. ६२ ही सहान जागा सरकारची नावे होती. तदनंतर सन १९८९ ते १९९० च्या दरम्यान सदर जागेच्या मालकी हक्कामध्ये “सरकारी” हे नाव कमी होऊन सीताहारी शिवराम या नावाची नोंद ग्रामपंचायत नमुना नं. ८ मध्ये करण्यात आलेली होती.

ई) सदरची सरकारी जागा सीताहारी शिवराम यांच्या नावावर घर क्षेत्र २१ X ३१ फुट व सहनजागा क्षेत्र ३९ x ४५ फुट अशी नोंद ग्रामपंचायत नमुना नं. ८ मध्ये बेकायदेशीर रित्या करण्यात आली होती.

उ) शिवाजी सीताहारी काकडे हे झोलेगाव ग्रामपंचायतीचे सन २००४ ते २००९ दरम्यान उपसरपंच म्हणून कार्यरत होते. त्या दरम्यान त्यांनी मिळकत क्रं. ६२ मधील सरकारी जागेवर अतिक्रमण करुन स्वतः च्या ताब्यात घेतली व त्या ठिकाणी घराचे बाधकाम केलेले आहे.

(ऊ) सदर अतिक्रमित घरामध्ये गैरअर्जदार क्रं. १ व त्यांचे वडील हे वास्तव्य करत असून अतिक्रमीत जागेचा उपभोग गैरअर्जदार क्रं. १ घेत आहेत.

ॠ) गैरअर्जदार क्रं. १ व त्यांच्या वडीलांनी सरकारी जागेची ग्रामपंचायत अभिलेखामध्ये स्वतःच्या नावे नोंद घेऊन खोटे रेकॉर्ड तयार केलेले आहे.

ऌ) गैरअर्जदार क्रं. १ यांनी व त्यांच्या वडीलांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केलेले असल्याने गैरअर्जदार क्रं. १ यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे जागा व आर.सी.सी. बांधकाम जागा यांची चर्तुःसिंमा सारखीच आहे. सदरील सहान जागेचे क्षेत्रफळ ३१ x ४५ चौरस फुटाचे नमुद करण्यात आलेले आहे. अशी कोणतीही सहान जागा प्रत्यक्ष त्या चतुःसीमाच्या आत शिल्लक असल्याचे दिसून येत नाही त्या ठिकाणी आर.सी.सी. बांधकाम केल्याचे दिसून येते.

ऊ.) चौकशी अहवालासोबत गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत अभिलेखाची प्रत सादर केलेली असून जबाब दाखल केलेला आहे.

तहसिलदार वैजापुर यांचा अहवाल-

५) तहसिलदार वैजापूर यांनी दिनांक ११/०४/२०२२ रोजी चौकशी अहवाल सादर करुन कळविले आहे की, दिनांक २०/०४/२०१२ रोजी ग्रामसेवक झोलेगाव हे मुळ नमुना ८ घेऊन तहसिल कार्यालय वैजापूर येथे हजर झाले. ग्रामपंचायत मुळ रजिस्टरची तपासणी केली असता वर्ष १९८६ मिळकतमध्ये ८ या वर्षी नमुना नं ८७-क्रवर सरकारी ६२. त आला आहेख करण्याणून उल्लेचावडी म्ह. व मिळकत क्रवर शिवाजी सीताहरी ६३. नावाची नोंद आहे. यांच्या सदर दोन्ही मिळकतीच्या क्षेत्रफळाचा उल्लेख नमुना नं मध्ये ८. पर्यंत वरीलप्रमाणेच आहे. ८८-१९८७ नाही व सदर नोंद वर्ष. परंतू वर्ष १९८९मध् ९० – ये मिळकत क्र ऐवजी सीताहरी शिवराम अशी नोंद केलेली वर शिवाजी सीताहरी यांच्या ६३. आदेशाने झाला याचा खुलासा अधिकाराने व कोणत्या आढळून येते सदर बदल कोणत्या वरील .६२ नमूद अनुक्रमांकपासून उपरोक्त ९०-१९८९ ग्रामसेवक करु शकले नाही वर्ष सरकारी चावडीची नोंद आढळुन येत नाही. २००० वर्ष. २००१ या कालावधीमधील नमुना नंची अवलोकन केले असता पान क्र ८.. ३८ वर सीताहरी शिवराम यांच्या नावे लाकुड, विटा, सिमेंट मकानचौ ३१ / २१ फुट व सहान जागा ३१x४५ अशी नोंद आढळून येते. वीक पाहवास्त. खाडाखोड येते सहान जागेची नोंद घेतांना आंकामध्ये ता वर्ष २००० २००१- नमुना नंया वर्षीच्या ९०-१९८९ वर्ष ८८ १९८७ वर्षयापूर्वीच्या. ८ मध्ये शिवाजी सीताहरी किंवा सीताहरी शिवराम यांच्या नावापुढे सहान जागेचा उल्लेख आढळून येत नाही २००१. आदेश नावा समोर सहान जागेची नोंद कोणत्या सीताहरी शिवराम यांच्यामध्येाने व कोणत्या अधिकाराने आली याचा उल्लेख नमुना नं नाही किंवा ग्रामसेवक मध्ये ८. बाबत खुलासा करु शकला नाही त्या. वर्ष १९८७ नमुना नंच्या ८८-८ ला अनुक्रमांक ६२ सहान जागा सरकारी चावडी अशी नोंद असने वर्ष २००० नमुना नंच्या २००१.८ वरून सदर सरकारी चावडीचे नोंद दिसून न येणे व त्याचवेळी सीताहरी शिवराम यांच्या नावे अचानकपणे सहान जागेची नोंद येणे याबाबी विचारात घेतल्यास सकृतदर्शनी सीताहरी शिवराम यांनी ग्रामपंचायत झालेगाव हद्दीतील सहान जागा सरकरी चावडी १९८७ वर्ष). ८८ च्या नमुना नंवरील नों ६२ अनुक्रमांकमध्ये ८. दचे दिसून यावर अतिक्रमण केल्या ( अजय शिवाजी काकडे यांचे आजोबा आहेत सीताहरी शिवराम हे ग्रामपंचायत सदस्य येते

६) सदर तहसिलदार वैजापूर यांनी त्यांच्या अहवालासोबत मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक झोलेगाव यांनी सादर केलेला संयुक्त अहवाल व पंचनाम्याची प्रत तसेच ग्रामपंचायत नमुना नंबर ८ ची प्रत सादर केलेली आहे.

७) गैरअर्जदार क्रं. १ यांनी दिनांक २५ / ११ / २०२२ रोजी त्यांचा लेखी जबाब दाखल करून निवेदन केले आहे की,

अ) गैरअर्जदार क्रं. १ हे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बहुमताने ग्रामपंचायत सदस्य पदावर निर्वाचीत झालेले आहेत.

आ) अर्जदाराने दाखल केलेला विवाद अर्ज संपूर्णतः बेकायदेशीर व चुकीचा असून गैरअर्जदाराने किंवा त्याच्या वडीलांनी कोणत्याही सरकारी जागेवर अथवा चावडीवर अतिक्रमण केलेले नाही.

इ) प्रस्तूतचा विवाद अर्ज हा अर्जदाराने राजकीय वैमानास्यातून दाखल केलेला नाही.

ई) अर्जदाराने गैरअर्जदार क्र. १ यांनी कोणत्याही सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याबाबतचा पुरावा सिध्द न केल्यामुळे अर्जदाराचा विवाद अर्ज फेटाळण्यात यावा.

उ) विस्तार अधिकारी पंचायत समीती वैजापूर चुकीचा चौकशी अहवाल सादर केलेला आहे.

(ऊ) सन १९८८-८९ चे ग्रामपंचायत रजिस्टर वर सहान जागा / चावडीची नोंद नसल्याचे दिसून येते.

ऋ) अर्जदार क्रं. १ यांचे वडील सन २००५ ते सन २०१० या कालावधीमध्ये उपसरपंच पदावर कार्यरत होते. तथापी अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. १ यांच्या वडीलांचा उपसरपंच पदाचा कालावधी हा सन २००४ ते सन २००९ असा चुकीचा नमुद केलेला आहे. मुळात अर्जदार यांच्या पॅनलचा सरपंच असल्यामुळे त्यांनी गैरअर्जदार क्रं. १ यांच्या वडीलांचे नाव कमी करून आजोबाच्या नावाची नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये घेतलेली आहे.

ऌ) गैरअर्जदार अजय शिवाजी काकडे हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून २०२१ पासून काम करत असून ग्रामपंचायत रजिस्टर नमुना नंबर ८ वर त्यांच्या मालकीची कोणतीही मालमत्ता किंवा घर, सहान जागा असल्याबाबत नोंद नाही. त्यांचे आजोबा मयत असून सीताहारी शिवराम काकडे यांचे नावे मिळकत क्रं. ७३ वर आर.सी.सी. बांधकाम ३१ X २१ चौरस फुट सहान जागा ४५ x ३१ चौरस फुट अशी नोंद आहे.

ए) गैरअर्जदार हे त्यांच्या वडीलांपासुन विभक्त राहतात. गैरअर्जदार हे देवगाव रंगारी तालुका कन्नड येथील मिळकत क्रं. २५१४ मध्ये विभक्त राहत आहेत.

ए) सन १९८८-८९ चे रजिस्टर वर सहान जागा / चावडीची नोंद नाही. त्यामुळे १९८६-८७, १९८७-८८ या काळामध्ये सरकारी जागा / चावडीची नोंद कशा आधारे घेण्यात आली याबाबत कुठलाही पुरावा नाही.

ए) गैरअर्जदार यांनी कोणत्याही सरकारी जागेवर अथवा मालमत्तेवर अतिक्रमण केलेले नाही असे चौकशी अहवालावरुन सिध्द होते. विवादीत जागेवर बांधकाम कोणी केले त्यासाठी बांधकाम परवाना घेण्यात आला किंवा कसे याबाबतचे अभिलेखे ग्रामपंचायत दप्तरी उपलब्ध नाहीत.

ए) अर्जदार किंवा त्यांचे वडील व कुटुंबातील अन्य सदस्यांनी कोणत्याही सार्वजनिक किंवा सरकारी जागेवर अतिक्रमण केलेले नसल्याने, अर्जदाराचा विवाद अर्ज दंडासह फेटाळण्यात यावा अशी विनंती गैरअर्जदार क्रं. १ यांनी त्यांच्या लेखी जबाबाद्वारे केलेली आहे.

ऑ) गैरअर्जदार क्रं. १ यांनी त्यांच्या लेखी जबाबासोबत मौजे देवगाव रंगारी तालुका कन्नड चा ग्रामपंचायत मिळकत, क्रं. २५१४ चा नमुना नंबर ८ चा उतारा मौजे देवगाव रंगारी ग्रामपंचायतीच्या सरपंच यांनी निर्गमीत केलेली रहिवाशी प्रमाणपत्राची प्रत इत्यादी कागदपत्र दाखल केलेली आहेत.

सुनावणी प्रक्रिया :- प्रस्तुत प्रकरणात अर्जदार व गैरअर्जदार यांची सुनावणी दि. २८.०९.२०२१, २६.१०.२०२१, १६.१२.२०२१, २२.०२.२०२२, १५.०३.२०२२, २१.०६.२०२२, व २२.११.२०२२ रोजी घेतलेली असून, दिनांक २२.११.२०२२ रोजी उभय पक्षाचा युक्तीवाद ऐकून प्रकरण निर्णयासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे.

९) निष्कर्ष :- प्रस्तुत प्रकरणात अर्जदाराने मुद्दा उपस्थित केला आहे की, ग्रामपंचायत मिळकत क्रं. ६२ ही सहान सरकारी जागा / चावडी असून सदर मिळकतीला लागून असलेली मिळकत क्रं. ६३ ही शिवाजी सीताहारी काकडे यांची होती. अर्जदाराने पुढे युक्तीवाद केला आहे की, मिळकत क्रं. ६२ मधील सरकारी जागेवर शिवाजी सीताहारी काकडे यांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी मिळकत क्रं. ६३ व ६२ वर एकत्रितरीत्या घराचे बांधकाम केलेले असून काही भाग सहान जागा म्हणून ताब्यात घेतलेला आहे.

शिवाजी सिताहारी काकडे हे गैरअर्जदार क्रं. १ यांचे वडील असल्याचे बाव उभय मान्य केलेली आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम कलम १४ (१) (ज-३) मधील तरतुदीनुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाने जनाबाई राठोड विरुध्द अपर आयुक्त अमरावती सिव्हील अॅप्लीकेशन ६८३२/२०१८ (एस.एल.पी. सिव्हील नं. २४२१२/२०१७) या प्रकरणात घालून दिलेल्या शासन तत्वानुसार कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यांनी अथवा त्याच्या एकत्रीत कुटुंबातील सदस्यांनी सरकारी अथवा सार्वजनिक वापराच्या जागेवर अतिक्रमण केलेले असल्यास व अतिक्रमीत जागेचा उपभोग सदर ग्रामपंचायत सदस्य है अतिक्रमण करणा-या व्यक्तीच्या एकत्रित कुटुंबातील सदस्य म्हणून उपभोग घेत असल्यास, सदर ग्रामपंचायत सदस्यास अर्नह ठरवण्याची तरतुद करण्यात आलेली आहे.

उपरोक्त कायदेशीर तरतुद सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली न्याय तत्व विचारात घेता तसेच तहसिलदार वैजापूर यांनी प्रकरणात दाखल केलेल्या स्थळ पाहणी चौकशी अहवालावरून सकृत दर्शनी हे स्पष्ट होते की, ग्रामपंचायत झोलेगाव चे नमुना नं. ८ मधील नोंदीनुसार मिळकत क्रं. ६२ ही पर सरकारी चावडी म्हणून उल्लेख कर आलेला होता व त्यालगत असलेली मिळकत क्रं. ६३ ही श्री. शिवाजी सिताहारी काकडे यांच्या नावावर नोंदविण्यात आलेली आहे. सन १९८९ ते १९९० या कालावधीमध्ये मिळकत क्रं. ६२ व मिळकत क्रं. ६३ या एकत्रीत मिळकतीवर शिवाजी सीताहारी काकडे याच्या ऐवजी त्यांचे वडील सीताहारी शिवराम या नावाने नोंद करण्यात आलेली आहे. मिळकत क्रं. ६२ वरील क्षेत्र हे मिळकत क्रं. ६३ मधील क्षेत्रामध्ये कशा आधारे समाविष्ट करण्यात आले व सीताहारी शिवराम काकडे यांच्या नावाची नोंद कशा आधारे घेण्यात आली याबाबत कोणतेही अभिलेखे दिसून येत नाही. एकत्रीत रित्या मिळकत क्रं. ६२ व ६३ वर शिवाजी सीताहारी व सीताहारी शिवराम यांनी २१ x ३१ चौरस फुट क्षेत्रावर घराचे बांधकाम केले असल्याने ३१ x ४५ चौरस फुट सहान जागा ताब्यात ठेवलेली आहे. मिळकत क्रं. ६२ व ६३ मधील जागेची नोंद ग्रामपंचायत अभिलेखामध्ये खाडाखोड केल्याचे आढळून येत असल्याबाबत तहसिलदार वैजापूर यांच्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.

मिळकत क्रं. ६२ ही सहान जागा सरकारी चावडी असल्याने सदर जागा ही मिळकत क्रं. ६३ मधील क्षेत्रामध्ये समाविष्ट करुन, मिळकत क्रं. ६३ चे क्षेत्र ग्रामपंचायत अभिलेखामध्ये फेरबदल करुन वाढविण्यात आल्याचे तहसिलदार वैजापूर यांच्या अहवालावरून स्पष्ट होते.

उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता तहसिलदार वैजापूर यांनी दिनांक ११.०४.२०२२ च्या अहवालाद्वारे हे स्पष्ट केले आहे की, सीताहारी शिवराम काकडे यांनी ग्रामपंचायत झोलेगाव हद्दीतील सरकारी चावडी सहान जागेवर अतिक्रमण केले असल्याचे स्पष्ट होते. व सीताहारी शिवराम काकडे हे ग्रामपंचायत सदस्य अभय काकडे यांचे आजोबा आहेत.

प्राप्त परिस्थितीमध्ये गैरअर्जदार क्रं. १ त्यांचे वडील व आजोबा सीताहारी शिवराम काकडे हे एकत्रीत कुटुंबातील सदस्य असल्याने, गैरअर्जदार क्रं. १ यांचे वडील व आजोबा यांच्या ग्रामपंचायत अभिलेखामध्ये अनाधिकृतपणे फेरवदल करून मिळकत .क्रं. ६२ या सरकारी चावडीचे क्षेत्र मिळकत क्रं. ६३ या सीताहारी शिवराम यांच्या नावे असलेल्या मिळकतीमध्ये समाविष्ट करून त्या ठिकाणी घराचे बांधकाम करून व सहान जागेवर अनाधिकृत ताबा करून अतिक्रमण केल्याची बाब स्पष्ट होत असल्याने, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम कलम १४ (१) (ज-३) मधील तरतुदीनुसार व  सर्वोच्च न्यायालयाने जनाबाई राठोड विरुद्ध अपर आयुक्त अमरावती या प्रकरणात घालुन दिलेली न्यायतत्व विचारात घेता, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी खालीलप्रमाणे आदेश परीत केले आहे.

आदेश :-
१) अर्जदार वसंत कारभारी काकडे, रा. झोलेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर यांनी दाखल केलेला विवाद अर्ज क्र. १८९/२०२१ हा मंजूर करण्यात येतो.

२) गैरअर्जदार क्रं. १ अजय शिवाजी काकडे (रा. झोलेगाव ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर) यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम कलम १४ (१) (ज-३) आणि १६ अन्वये ग्रामपंचायत झोलेगाव ता. वैजापूर चे सदस्य पदावरून तात्काळ प्रभावाने अपात्र ठरविण्यात येते व सदरचे पद रिक्त घोषीत करण्यात येते.

Back to top button
error: Content is protected !!