महाराष्ट्रवैजापूर

अंगणवाडी सेविकांची स्कुटीवरून रॅली, वेतनश्रेणीच्या दर्जासाठी पाचव्या दिवशीही संप !

संभाजीनगर लाईव्ह, दि. 24 – मागील 20 तारखेपासून संपूर्ण राज्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला राज्यात प्रतिसाद मिळत आहे. पाचव्या दिवशीही संपाची धार कायम होती. दरम्यान, वैजापूरमध्ये आज स्कुटीवर रॅली काढण्यात आली.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पूर्व प्राथमिक शिक्षकेचा दर्जा व वेतनश्रेणी मिळावी यासाठी 20 फेब्रुवारी 2023 पासून राज्यव्यापी संपामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस काळ्याफिती लावून करत आहे.

शिक्षक आमदार कपिल पाटील,पूर्व प्राथमिक शिक्षक भारती राज्यअध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या मार्गदर्शनाखाली 20 फेब्रुवारी 2023 पासून अंगणवाडी सेविका यांचा राज्यव्यापी बेमुदत संपात महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक (अंगणवाडी)शिक्षक भारती संघटने अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी मध्ये काळ्याफिती लावून काम काम करून अंगणवाडीतील 3-6 वयोगटातील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप करत आहे.

तसेच ग्रामपंचायत मार्फत अंगणवाडीसाठी येणारा निधी या मधून अंगणवाडीमध्ये लाभार्थ्यांना आहार शिजवण्यासाठी गॅस सिलेंडर शिजवण्यासाठी इतर साहित्य व पाणी नळ जोडणी करण्यात यावी. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना वैजापूर पंचायत समिती सभागृहांमध्ये बैठकीदरम्यान भेटून निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

निवेदन देताना महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक अंगणवाडी शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष माया म्हस्के, तालुका अध्यक्ष पुष्पा जाधव तालुका संघटक अश्विनी सोनवणे शांता जारवाल, गीतांजली पहाडे, कविता चौधरी यांची उपस्थिती होती.

Back to top button
error: Content is protected !!