वैजापूर
Trending

वैजापूरच्या जांबाज पोलिसांनी रात्री शेतामध्ये दोन किमी थरारक पाठलाग करून दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या ! शिवराई शिवारात दुचाकीस्वारांना केली लुटमार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – पोलीस स्टेशन वैजापूर हद्दीमधे शस्त्राने मारहान करून रोड रॉबरी करणाऱ्या चोरट्यांना वैजापूर पोलीसांनी पाठलाग करून काही तासांतच जेरबंद केले. रात्रीच्या सुमारास रंगलेले हे थरारनाट्य सुरुवातीला गाडीने पाठलाग व त्यानंतर अंधारात शेतात तब्बल २ किलोमीटर पायी पाठलाग करून पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. अंधाराचा फायदा घेऊन दोघे पसार झाले.

सौरभ उर्फ बाबू विकी रुझासिओ (वय 19 वर्षे रा. ईनामवाडी, शिर्डी ता. जि. अहमदनगर), कृष्णा प्रकाश भोळे (वय 24 वर्ष रा. आंबेडकर नगर सिन्नर जि.नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत.

दिनांक- 24/02/2023 रोजी 23.30 वाजेच्या सुमारास डायल 112 वर माहिती मिळाली की, शिवराई (ता. वैजापूर)  शिवारात रोडने जाणाऱ्या दोन मोटार सायकल स्वारांना पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी (क्रमांक- MH-23-AD-1216) ज्यामध्ये चार जण असून त्यांच्याकडे लोखंडी रॉड, चाकू असे घातक शस्त्र आहेत. त्यांनी त्या मोटार सायकल स्वारांना व त्यांच्या सोबतच्या महिलांना मारहान करून त्यांच्या अंगावरील सोने व पैसे लुटून नेले आहे व ती गाडी लासूर स्टेशनच्या दिशेने गेली आहे.

मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇

https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne

जबरी चोरीच्या मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने मनीष कलवनिया पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ स्वतः वायरलेस द्वारे सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. याचप्रमाणे  वैजापूर उपविभागातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत पोलिसांची पथके तयार करून त्यांना संशयित वाहनाला पकडण्याच्या सूचना दिल्या.

याचप्रमाणे वैजापूर पोलिसांची तीन पथक तयार करून एक पथक शिवराई, करंजगांव भागाकडे रवाना केले. तर दुसरे पथक डॉ. आंबेडकर पुतळा वैजापूर येथे व तिसरे पथक गंगापूर चौफूली नाकाबंदीसाठी लावले.

यावेळी संशयित वाहनाने आंबेडकर चौकातील नाका बंदी ही भरधाव वेगाने तोडून पुढे येवला रोड रोडच्या दिशेने सुसाट वेगाने निघाले. वैजापूर पोलिसाच्या सर्व पथकांनी वाहनाचा मागे पाठलाग सुरू केला. हा थरार रात्रीच्या दोन वाजेपर्यंत सुरू होता. पोलीस मागावर असल्याचे बघून आरोपीनी त्यांचे वाहन पुरणगाव रोडने नेऊन शेतीच्या कडेला लावून वाहन लॉक करून अंधारात शेताच्या  दिशेने पळत सुटले. यावेळी मागावर असलेल्या पोलिसांनी सुद्धा त्यांचा शेवटपर्यंत पाठलाग सुरू ठेवून अंधाऱ्या शेतामध्ये दोन किलोमीटर पर्यंत पळत जाऊन दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले.  दोन आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

यावेळी सौरभ उर्फ बाबू विकी रुझासिओ (वय 19 वर्षे रा. ईनामवाडी, शिर्डी ता. जि. अहमदनगर), कृष्णा प्रकाश भोळे (वय 24 वर्ष रा. आंबेडकर नगर सिन्नर जि.नाशिक) यांना पकडण्यात आले. पकडलेल्या दोन आरोपीतांकडून दोन लोखंडी रॉड, एक बोलेरो गाडी क्रमांक- MH-23-AD- 1216 हे जप्त करण्यात आले आहे.

यातील जखमी ज्ञानेश्वर सुभाष डुकरे (वय 26 वर्ष व्यवसाय शेती व होमगार्ड रा. तिडी, ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर) यांचे जबाब नोंदवून कलम 394 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पूढील तपास वैजापूर पोलीस करीत आहे.

 रोड रॉबरी करणाऱ्या या चोरट्यांची 23.30 वाजेला माहिती मिळतात  अत्यंत सतर्कपणे त्यांना दोन ते अडीच तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी पकडे पर्यंत पोलीस अधीक्षक यांनी स्वतः रात्रभर सर्व परिस्थिती हाताळण्याबाबत मार्गदर्शन व सूचना देऊन सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवर, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, पोउपनि मनोज पाटील, पोउपनि रज्जाक शेख, सफौ / महादेव निकाळजे, सफी/विठ्ठल जाधव, पोलीस अंमलदार योगेश झाल्टे, भगवान सिंघल, प्रशांत गिते, विजय भोटकर, वाल्मीक बनगे, गोरक्ष सदगीर, नवनाथ केरे, नवनाथ निकम, ज्ञानेश्वर पाडळे, गणेश पैठणकर, मपोना/सिमा जाधव, तीन होमगार्ड यांच्या पथकाने केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!