छत्रपती संभाजीनगर
Trending

रिक्षा मे बैठ नहीं तो यहीं खुपस दुंगा, अब तुझे कौन बचाएगा ? चाकू, बेल्ट अन् हॉकी स्टिकने मारहाण केली, मारहाणीत बेशुद्ध पडलेल्या युवकास मृत समजून तिघांनी धूम ठोकली !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – युवकाला धमक्या टाकून बळजबरीने रिक्षात बसवले. त्याला आमखास परिसर येथे नेले. तेथे त्याच्यावर बकऱ्या चोरीचा आरोप करून बेदम मारहाण केली. चाकू, हॉकी स्टिक अन् बेल्टने तिघांनी त्याच्यावर हल्ला चढवला. या मारहाणीत जखमी होऊन युवक बेशुद्ध पडला. तो मृत्यू पावल्याचे समजून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. ही घटना दुपारी १२.३० वाजता राजीवनगर रेल्वे उड्डाणपुलाखालून ते आमखास परिसर या दरम्यान घडली.

शेखर मिलींद चव्हाण (वय २० वर्षे, रा. राजीव नगर, रेल्वे स्टेशन उड्डाणपुलजवळ, छत्रपती संभाजीनगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. शेख अकिल शेख सलीम व त्याच्या तीन साथीदारांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे..

यातील आरोपीतांनी संगणमत करून राजिव नगर, रेल्वे स्टेशन उड्डाणपुला खालून फिर्यादी शेखर चव्हाण यांना जिवे मारण्याच्या उद्देश्याने आरोपी शेख अकिल शेख सलीम याने चाकुचा धाक दाखवून गपचूप रिक्षा मे बैठ नही तो यंही खुपस दुंगा अशी धमकी दिली. बळजबरीने रिक्षामध्ये बसवून घेतले.

त्यानंतर तेथून फिर्यादी शेखर चव्हाण यास आमखास परिसर येथे नेले. त्यांचेवर बकऱ्या चोरल्याचे आरोप लावून शिवीगाळ करून अकीलने हातातील चाकू दाखवून अब तुझे कौन बचाएगा तेकू मै खतम करता अशी धमकी दिली. फिर्यादीस जिवे मारण्याच्या उद्देश्याने अकीलने चाकुने, त्याच्या एका साथिदाराने बेल्टने आणि दोघांनी लाकडी हॉकी स्टीकने मारहाण केली.

या मारहाणीत फिर्यादी शेखर चव्हाण हा युवक जखमी होवून बेशुद्ध पडला. त्याला मेलेला समजून तेथेचे सोडून शेख अकिल शेख सलीम व त्याच्या साथीदारांनी धूम ठोकली. त्यानंतर जखमी फिर्यादी शेखर चव्हाण याने पोलीस स्टेशन गाठले. अन् सविस्त फिर्याद कथन केली.

शेखर मिलींद चव्हाण (वय २० वर्षे, रा. राजीव नगर, रेल्वे स्टेशन उड्डाणपुलजवळ, छत्रपती संभाजीनगर) याने दिलेल्या फिर्यादीवरून वेदांतनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि देवकते करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!