महाराष्ट्र
Trending

ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला ! 2 हजार 359 गावांत 5 नोव्हेंबरला मतदान, 130 सरपंच पदासाठीही होणार पोटनिवडणूक !!

3 हजार 80 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान

मुंबई, दि. 3 : राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्य पदाच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील.

त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 6 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. मात्र, गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल.

Back to top button
error: Content is protected !!