छत्रपती संभाजीनगर
Trending

समृद्धी महामार्गावरील सावंगी बोगद्याजवळ युवकाचा हवेत गोळीबार ? काळ्या जीपचा व्हिडियो व्हायरल, पोलिस लागले कामाला !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून नुकतेच लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावर हवेत गोळीबार केल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे ठिकाण सावंगी येथील बोगद्याजवळ असल्याचा व्हायरल व्हिडियोवरून प्राथमिक अंदाज येतो.

नागपूर येथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच रविवारी मोठ्या थाटा-माटात करण्यात आले. रविवार, ११ डिसेंबरपासून हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे.

लोकार्पणापूर्वी या महामार्गावर अपघातात अनेकांचा बळी गेल्याने हा महामार्ग चर्चेत आला. याच महामार्गावरून बैलगाड्यांचा व्हिडियोही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच चर्चा झाली. दरम्यान, आता या महामार्गावरील बोगद्याजवळ एका युवक काळ्या जीमधून उतरतो. जीपच्या पुढे येऊन हवेत गोळीबार करतो. अगदी चित्रपटाला शोभेल असे या व्हिडियोचे चित्रिकरण करण्यात आले आहे.

हा व्हिडियो खरा आहे की रिल करण्यात आली आहे, याचा तपास पोलिस करत आहे. त्या युवकाकडे बंदुकीचा परवाना आहे का ? त्याने हवेत गोळीबार का केला ? ही घटना कधीची आहे ? गोळीबार करण्याचा नेमका हेतू काय होता ? याचा तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!