राजकारण
Trending

कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली ! झेडपीच्या शाळा बंद केल्या तर याद राखा : नाना पटोले

२० किलोमीटरच्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करुन एकच शाळा सुरु ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न: नाना पटोले

मुंबई, दि. २३- पटसंख्येच्या नावाखाली राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद कराल तर याद राखा असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. सध्या हा विषय सोशल मीडियावर चर्चीला जात आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या हालचाली मनुवादी भाजपा सरकारने सुरु केल्या आहेत.

शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना घरापासून जवळ शिक्षण उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. परंतु २० किलोमीटरच्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करुन एकच शाळा सुरु ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, आहे असा दावाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

सरकारचा हा निर्णय बहुजन समाजातील मुलांना शिक्षणांपासून वंचित ठेवणारा असून पटसंख्येच्या नावाखाली राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद कराल तर याद राखा, असा इशाराही नाना पटोले यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Back to top button
error: Content is protected !!