जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यानंतर त्वरित शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया राबवणार ! मासिक वेतन, दीर्घ मुदतीच्या रजा, पेन्शन प्रस्तावावरही चर्चा !!
सीईओंचे शिष्टमंडळास आश्वासन
- म.रा.शिक्षक परिषद व आदर्श शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सीईओ यांची भेट.!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ३- जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यानंतर लगेच शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया राबवणार असल्याचे आश्वासन सीईओं यांनी शिष्टमंडळास दिले. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांची प्रक्रिया 15 मे पर्यंत पूर्ण करून त्यानंतर शिक्षकांच्या प्रलंबित पदोन्नतीच्या प्रक्रियेस वेग येणार आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व आदर्श शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विकास मिना यांची प्रत्यक्षात भेट घेऊन जिल्हा परिषद अंतर्गत मागील 13 महिन्यांपासून बहूचर्चेत असलेले प्रश्न म्हणजे मुख्याध्यापक ,केंद्रप्रमुख, पदवीधर शिक्षक ,माध्यमिक शिक्षकांच्या पदोन्नती व निवड श्रेणी, कर्मचारी कल्याण निधी हिशोब याबाबतीत संघटनांनी गेली अनेक वर्षपासुन सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने आजपर्यंत केवळ पदोन्नतीसाठी तारीख पे तारीख देऊन संघटना पाठोपाठ वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची हेटाळणी करीत आलेले आहे. पदोन्नतीच्या प्रक्रियेची संचिका महिना झाला सामान्य प्रशासन विभागत आहे. त्यावर त्वरित कार्यवाही होऊन पदोन्नती व्हावी अशी मागणी सीईओ कडे केली असता सीईओ यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांची प्रक्रिया 15 मे पर्यंत पूर्ण करून त्यानंतर त्वरित शिक्षकांच्या प्रलंबित पदोन्नतीच्या प्रक्रिया पूर्ण करू असे आश्वासन चर्चे दरम्यान सीईओ यांनी शिष्टमंडळाला दिले.
पदोन्नती पाठोपाठ निवडश्रेणी, चटोपाध्याय, मासिक वेतन, पुरवणी देयके, दीर्घ मुदतीच्या रजा, पेन्शन प्रस्ताव निकाली काढणे आदी सह विविध प्रलंबित मागण्याचे निवेदन प्रत्यक्षात चर्चा करून सीईओ यांना दिले आहे. निवेदनाच्या प्रती आयुक्ताना सादर करण्यात आल्या. 20 मे पर्यंत मागण्या निकाली निघाल्या नाहीत तर मंत्रिमंडळास निवेदन देऊन शासन स्तरावर आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शिष्टमंडळात शिक्षक परिषदेचे राज्य नेते बाबुराव गाडेकर, दिलीप गोरे, श्रीराम बोचरे, जीजा उकर्डे, शिवाजी दांडगे, जगन ढोके, आप्पासाहेब चव्हाण, गोपाल सोनार,सुखदेव दाभाडे, अरूण म्हस्के, विलास सोनवणे, गणेश चव्हाण, आर.डी.चव्हाण, संजय बहुले,गणेश सोनवणे,यांची तर आदर्श शिक्षक समितीचे संस्थापक दिलीप ढाकणे, अंजुम पठाण, केसी गाडेकर, संतोष बरबंडे, मनोहर पठे, बाबासाहेब सांगळे, अनिल सोनवणे, शाकीर अली, राजेश आचारी, बाबूलाल राठोड, ज्ञानेश्वर पठाडे, संजीव देवरे, शिवाजी एरंडे, भरत सदभावे आदींची उपस्थिती होती.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe