छत्रपती संभाजीनगर
Trending

मी तिच्यावर प्रेम करतो, तू तिच्यासोबत बोलू नको म्हणून अकरावीच्या विद्यार्थ्याला हर्सूल तलावाजवळ मारहाण ! रुमालाचा बोळा तोंडात कोंबून लिंबाच्या काठीने सपासप मारले, कपडे काढून मोबाईलमध्ये फोटो व व्हीडीओ काढला !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ – मी तिच्यावर प्रेम करतो, तू तिच्यासोबत बोलू नको म्हणून अकरावीच्या विद्यार्थ्याला हर्सूल तलावाजवळ पाच मुलांनी बेदम मारहाण केली. रुमालाचा बोळा तोंडात कोंबून लिंबाच्या काठीने सपासप मारले. कपडे काढून मोबाईलमध्ये फोटो व व्हीडीओ शुटींग करून धमकावले. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली. एसबीओ शाळेजवळून त्या विद्यार्थ्याला बळजबरीने मोटारसायकलवर बसवून हर्सूल तलावाजवळ नेले तेथे पाच जणांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली. मारहाण करणारी मुलं ही मयुरपार्क परिसरातील आहेत.

मयुर पार्क, छत्रपती संभाजीनगर येथील अकरावीच्या विद्यार्थ्याने पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 26/10/2023 रोजी संध्याकाळी 6.00 वाजेच्या सुमारास सदर अकरावीचा विद्यार्थी त्याच्या बहिणीला ट्युशनला सोडण्यासाठी S.B.O. शाळेच्या पाठीमागे गेला. तिला टयुशनला सोडल्या नंतर S.B.O. शाळेच्या समोर त्याला त्याच्या ओळखीचे दोन मुले भेटले. ते मोटारसायकलवर आले होते. ते सदर अकरावीच्या विद्यार्थी मुलास म्हणाले की, आपल्याला थोडे काम आहे आपण जावून येऊ असे म्हणाले व गाडी वर बैस असे म्हणाले असता त्याने त्यांना बसण्यास नकार दिला असता त्यांनी शिवीगाळ करून बळजबरीने मोटारसायकलवर दोघाच्या मध्ये बसवून हर्सूल तलावच्या थोडे पुढे जटवाडा रोड येथे घेवुन गेले.

तेथे घेवून गेल्यानंतर थोड्याच वेळात या दोघांशिवाय मयुरपार्क मारुतीनगर येथील आणखी तीन मुले मोटारसायकलवर आले. तेथे आता पाच मुले जमले होते. यातील एक जण त्या अकरावीच्या विद्यार्थी मुलाला म्हणाला की, तू तुझ्या मैत्रीणीसोबत बोलू नको मी तिच्यावर प्रेम करतो व पूर्वी सुध्दा करत होतो. त्यावर अकरावीचा विद्यार्थी मुलगा त्यास म्हणाला की, ती माझी बेस्ट फ्रेड आहे मी तिच्या सोबत बोलेल असे म्हणताच त्याला चापट बुक्याने मारहाण करण्यास सुरवात केली.

त्यानंतर एकाने रुमालाचा बोळा त्या अकरावीच्या विद्यार्थी मुलाच्या तोंडात कोंबून लिंबाच्या झाडाची काठीने पाठीवर, दोन्ही मांड्यावर, डाव्या बरगडीवर, डाव्या हातावर मारले. यात तो जखमी झाला. पाचपैकी तीन मुलांनी त्याला चापट बुक्याने व लाथा बुक्याने मारहाण केली. एकाने त्या अकरावीच्या विद्यार्थी मुलाचे कपडे काढून त्याचे मोबाईलमध्ये फोटो काढले व व्हीडीओ शुटींग केली. रात्री 10.15 वाजता त्या अकरावीच्या विद्यार्थी मुलास मोटर सायकलवर पाठीमागे बसवून त्याच्या घरी मयुरपार्क येथे सोडले. व पुन्हा दोन दिवसांनी मारीन असे धमकावले.

त्यानंतर तो अकरावीचा विद्यार्थी मुलगा घरी गेला व घडलेली सर्व हकीकत कथन केली. त्यानंतर त्यांनी हर्सूल पोलिस स्टेशन गाठून मेडिकल मेमो घेवून घाटीत उपचार केले. याप्रकरणी सदर अकरावीच्या विद्यार्थी मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पाच मुलांवर सिडको पोलिस स्टेशनमध्ये मयुरपार्कच्या पाच मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!