छत्रपती संभाजीनगर
Trending

पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह विधीसंघर्ष बालकांची टोळी पकडली ! मोबाईलधारक ही टोळी संजयनगर, मुकुंदवाडीत ऑपरेट करायचा; मार्केटमध्ये खोट्या नोटा चालवून खरी चिल्लर जमा करायचा गोरखधंदा उघडकीस !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ – एका मोबाईलधारकाने विधीसंघर्ष बालकांना हताशी धरून मार्केटमध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटा चालवून चिल्लर स्वरुपात खर्या नोटा जमा करण्याच्या गोरखधंद्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पाच विधीसंघर्ष बालकांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या एकूण १९ नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

२७ ऑक्टोबर रोजी १४.१५ वाजता व त्यापूर्वी संजयनगर मुकुंदवाडी परिसरात या नोटा चलनात आणल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. विधीसंघर्ष बालकांच्या माध्यमातून मार्केटमध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणनार्या त्या मोबाईलधारकाचा शोध पोलिस घेत आहे. दरम्यान, पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणारी टोळी पकडल्याने छत्रपती संभाजीनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मुकुंदवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक गणेश संताजीराव वैराळकर यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, एक मोबाईलधारक पाच विधीसंघर्ष बालकांच्या माध्यमातून या बनावट नोटा चलनात आत होते. संजयनगर, मुकुंदवाडी भागातील हे विधीसंघर्ष बालक या नोटा चलनात आणायचे. भरतीय चलनी नोटा सारख्या दिसणार्या बनावट नोटा ह्या खर्या नोटा म्हणून वापरा व चिल्लर आणा असे म्हणून बनावट नोटा चलनात आणल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिस नाईक गणेश संताजीराव वैराळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच विधीसंघर्ष मुलांसह हे रॅकेट ऑपरेट करणार्या मोबाईलधारकावर मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमध्ये 465/2023 कलम 489 (A), 489(B), 120(B) 489(C), नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि घुनावत करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!