छत्रपती संभाजीनगर
Trending

छत्रपती संभाजीनगरकरांसाठी म्हाडाचे १२८४ घरे उपलब्ध होणार; नक्षत्रवाडी १०५६, पडेगाव १६८, चिकलठाण्यात ६० घरे ! लातूर व अंबाजोगाईत दुसऱ्या फेजमध्ये २०० घरे बांधण्याचे नियोजन !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २९- म्हाडाच्या वतीने आगामी काळात शहर आणि परिसरात घरे बांधण्यात येणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेला गती देण्यासाठी शहरासह परिसर आणि मराठवाड्यात म्हाडाने पुढाकार घेतला आहे. नक्षत्रवाडी, पडेगाव व चिकलठाण्यात ही घरे बांधली जाणार आहेत.

शहरातील देवळाई परिसरातील म्हाडाच्या १०.७९ हेक्टर जागेवर महापालिकेने टाकलेले आरक्षण उठवल्यास तेथे अतिरिक्त घरांची योजना राबवण्यास मदत होईल. त्यासाठी संबंधित आरक्षण उठवण्यासाठी म्हाडाच्या वतीने प्रस्ताव देण्यात आला आहे. म्हाडाच्या घरांचे प्रकल्प शहर व परिसरात राबवण्यासाठी आपण प्राधान्य देत आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना घर या योजनेला बळकटी देण्यासाठी नक्षत्रवाडी परिसरात अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी वन रूम किचन घरे बांधली जाणार आहेत.

लातूर व अंबाजोगाई येथे दुसऱ्या फेजमध्ये २०० घरे बांधण्याचे नियोजन आहे. देवळाई येथे म्हाडाच्या १०.७९ हेक्टर जमिनीवर सिडको झालर क्षेत्राच्या प्रारूप विकास आराखड्यात असलेले क्रीडांगणाचे आरक्षण हटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

Back to top button
error: Content is protected !!