महाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांची वाढ ! पेन्शन योजनाही सुरू करणार !!

मुंबई, दि. 28 – मागील नऊ दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. याशिवाय सेवासमाप्ती नंतर पेंशन योजनाही सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय मोबाईलही देण्यात येणार आहे.

कामाच्या मोबदल्यात अत्यल्प मोबदला मिळत असल्याने राज्यातील अंगणवाडी सेविकांनी संपाचे हत्यार उपसले होते. यापूर्वी केलेल्या आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वसनाची पुर्ती राज्य सरकार करत नसल्याने अंगणवाडी सेविकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. २० फेब्रुवारीपासून पुकारलेल्या संपाची तीव्रता वाढत होती.

अंगणवाडी सेविका व मदतनीस दि. 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर आहेत. वर्षानुवर्षे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविसा, मदतनीसांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दर्जा, मानधनांमध्ये भरघोस वाढ ,न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युएटी, दरमहा पेन्शन ,नवीन मोबाईल आदी मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

या संपाचा आजचा नववा दिवस असून संपाची तीव्रता वाढत आहे. राज्य सरकारी कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग आणि अंगणवाडी सेविकांना तुटपुंजे मानधन देऊन राज्य सरकार दुजाभाव करत असल्याची भावना अंगणवाडी सेविका व्यक्त करत आहे.

गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील सुमारे दोन लाखापेक्षा जास्त अंगणवाडी कर्मचारी राज्यातील लाखो बालकांचे पोषण, शालेय पूर्व शिक्षण, गरोदर मातांची काळजी असे महत्त्वाचे कार्य करत आहेत .परंतु त्यांच्या मागण्याकडे केंद्र व राज्य सरकार सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळात संपूर्ण विश्व घरात बंदिस्त असताना अंगणवाडी सेविकांनी मात्र घरोघरी जाऊन आरोग्य दूताचे काम केले. आपल्या जीवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन त्यांनी जागृती आणि प्रबोधनाचे कार्य तितक्याच इमानेइतबारे पार पाडले. मात्र, राज्य आणि केंद्र सरकार अंगणवाडी सेविकांकडे दुर्लक्ष करत आहे.गेल्या २० तारखेपासून राज्याच्या विविध भागात अंगणवाडी सेविकांनी संप पुकारलेला आहे.

दरम्यान मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे सरकारला घाम फुटला. कुंभकर्णी झोपेत असलेल्या राज्य सरकार खडबडून जागे झाले. या आंदोलनाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असून मानधनवाढीशिवाय आता माघार नाही, अशी भूमीका त्यांनी घेतली होती.

या आंदोलनापुढं सरकार नरमल आणि माणधनवाढीचा निर्णय घेतला. मागील नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला काहीसे यश मिळाले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. याशिवाय सेवासमाप्ती नंतर पेंशन योजनाही सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय मोबाईलही देण्यात येणार आहे. सविस्तर बातमी लवकरच….

Back to top button
error: Content is protected !!