राजकारण
Trending

एकनाथ शिंदेसह १६ आमदार लवकरच अपात्र ठरतील ! अजितदादांच्या शपथविधीवेळी शिंदे गटाच्या आमदारांचे चेहरे पाहण्यासारखे: संजय राऊत

मुंबई, दि. २ – हे घडणारच होतं. याला मी राजकीय भूकंप वगैरे मानत नाही. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार असल्याचा दावा करत एक इंजिन लवकरच बंद पडणार असल्याने सरकारला आता अजित दादांच्या इंजिनच्या पाठिंब्याची गरज पडली आहे हे या शपथविधीवरून स्पष्ट होतं. १६५ ते १७० आमदारांचा पाठिंबा असल्याच्या दावा शिंदे-फडणवीस करत आहे. पूर्ण बहुमत असतानाही त्यांना राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची काय गरज ? हे राजकारण जास्त दिवस चालणार नाही. शिंदे सरकार अपात्र ठरल्यानंतर महाराष्ट्राला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळेल. आजचा शपथविधी सुरु असताना शिंदे गटांच्या आमदारांचे चेहरे पाहण्यासारखे होते, असा टोलाही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लगावला.

महाराष्ट्राच्या राजकाराणात आज मोठा भूकंप झाला. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सुमारे ३५ आमदरांना घेऊन सरकारमध्ये सहभागी झाले. अजितदादांनी उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्याच्या राजकारणात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री असतील.

राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी झाल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली. राऊत म्हणाले, भूकंप वगैरी मी मानत नाही. अजित पवारा यांच्या समर्थक आमदारांनी शपथ घेतली. याचा अर्थ असा आहे की, सध्याचे सरकार अस्थिर आहे, हे स्पष्ट होते. १६५ ते ७० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे फडणवीस करीत आहेत. यांच्याकडे जर पूर्ण बहुमत असतील तर  मग यांना अजित पवार समर्थक आमदारांचा पाठिंबा कशाला हवा ?

सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयात शिंदे गटावर ताशेरे ओढण्यात आले आहे. लवकरच शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार आहे. शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद लवकरच जाणार आहे. एक इंजिन बंद पडण्याच्या मार्गावर असून त्यांनी दुसर्या इंजिनची मदत घेतली जाणार आहे, हेच यावरून स्पष्ट होतं.

माझं पवार साहेबांशी आत्ताच बोलनं झालं आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत. उद्धव ठाकरे , पवार साहेब आणि महाविकास आघाडी आम्ही सर्व एकत्र निवडणूक लढवणार आहोत, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!