महाराष्ट्र
Trending

मदुराई वेरावळ आणि द्वारका मदुराई दरम्यान 21 विशेष रेल्वे गाड्या !

नांदेड, दि. १६ – दक्षिण रेल्वे ने ‘सौराष्ट्र तमिळ संगमम’ ला होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून मदुराई- वेरावळ आणि द्वारका- मदुराई दरम्यान विशेष गाडीच्या 21 फेऱ्या करण्याचे ठरविले आहे.

या विशेष रेल्वे गाड्या पुढील प्रमाणे –
1. गाडी क्र. 06301 मदुराई ते वेरावळ विशेष (10 फेऱ्या) : ही गाडी मदुराई येथून दिनांक 14 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान 10 दिवस रोज सायंकाळी 17.40 वाजता सुटेल आणि चेन्नई, काचीगुडा, नांदेड, पूर्णा, अकोला , सुरत, अहेमदाबाद, राजकोट मार्गे वेरावळ येथे चौथ्या दिवशी सकाळी 07.30 वाजता पोहोचेल.

2. गाडी क्र. 06302 द्वारका-मदुराई विशेष (11 फेऱ्या) : ही गाडी द्वारका येथून दिनांक 19 एप्रिल ते 29 एप्रिल दरम्यान 10 दिवस रोज रात्री 22.20 वाजता सुटेल आणि राजकोट, अहेमदाबाद, सुरत, अकोला , पूर्णा, नांदेड, काचीगुडा, चेन्नई मार्गे मदुराई येथे चौथ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.

3. दोन्ही गाड्या मध्ये 15 डब्बे असतील, ज्यात वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल चे डब्बे आहेत.

Back to top button
error: Content is protected !!