राज्यात उलट्या पायाचं सरकार आलं अन् गारपिट झाली ! संभाजीनगरच्या सभेनंतर यांनी गोमूत्र शिंपडले, तिथे आलेली लोक काय माणसे नव्हती?
उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, नागपूरच्या विराट सभेत भाजपा व शिंदे गटावर टीकास्र
नागपूर, दि. १६ – आठ दहा दिवस अगोदर फडतुस शब्द निघाला पण त्यामागचा उद्देश काय होता. हे उलट्या पायाचे सरकार आल्यावर अवकाळी, गारपीट होतेय. आमचे डोळे वेळेत उघडले. आम्ही आधी काम करून दाखवले मग सभा घेतोय. गद्दारी करून सरकार पाडले ही महाराष्ट्राची परंपरा नाही. आम्ही वार झेलू तो छातीवर आणि करु तोपण छातीवर असा हल्लाबोल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या विराट सभेत आज केला. काँग्रेस मध्ये हिंदू नाहीत? आमच हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही. यांचे हिंदुत्व हे गोमूत्रधारी आहे. संभाजीनगरच्या सभे नंतर यांनी गोमूत्र शिंपडले. तिथे आलेली लोक काय माणसे नव्हती? असा सवालही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला.
महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज नागपुरात पार पडली. या सभेला विराट जनसमुदाय जमला होता. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रधानमंत्री, भाजपा आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. हिंदुत्व, महागाई, बेरोजगारी आणि गारपिट या मुद्यांना हात घालून सरकारवर कडक ताशेरे ओढले. त्यांनी केलेले भाषण त्यांच्याच शब्दात…
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,
आजची मविआची दुसरी सभा आहे. आजची सभा उपराजधानीत होतेय. मागे कस्तुरचंद पार्कला सभा घेतली तेव्हा शेतकऱ्यांच्यी कर्जमुक्ती करण्याचा निश्चय केला. धर्माधिकारी यांना पुरस्कार देण्यात आला पण घराणेशाहीचा विरोध करणाऱ्या घेण्याचा सत्कार करावा लागला. ते मोठे घराणे आहे. त्यांचे व्यसनमुक्तीचे मोठे काम आहे. सत्तेची नशा देश नासवते. आपल्या देशात लोकशाहीचा उपयोग फक्त सत्तेत बसलेल्यांच्या मित्रांसाठी आणि मतदार बनवण्यासाठी. यांच्या मित्राचा क्रम मात्र श्रीमंतीत वाढतोय आणि देशाचा सगळ्या बाबतीत खालवतोय. ह्या भूमीत बाबासाहेबांनी माणसाला ओळख निर्माण करून दिली. आता भारत मातेच्या पायात बेड्या घालण्याचे काम सुरू आहे. बाबासाहेबांनी आयुष्य दिल घटना दिली. त्यांच्या घटनेचे रक्षण मीच करणार ही आपण सगळ्यांनी निश्चय करण्याची गरज आहे.
आठ दहा दिवस अगोदर फडतुस शब्द निघाला पण त्यामागचा उद्देश काय होता. हे उलट्या पायाचे सरकार आल्यावर अवकाळी, गारपीट होतेय. आमचे डोळे वेळेत उघडले. आम्ही आधी काम करुन दाखवले मग सभा घेतोय. गद्दारी करुन सरकार पाडले ही महाराष्ट्राची परंपरा नाही. आम्ही वार झेलू तो छातीवर आणि करु तोपण छातीवर.
मी अयोध्येला गेलो तेव्हा सुनील केदार पण सोबत होते. शिवसेनेने पहिले मंदिर फिर सरकार हा नारा दिला. आम्ही कायदा करा म्हणालो पण मोदींनी धाडस केले नाही. आता कोर्टाने निकाल दिल्यावर श्रेय घेताहेत. मुख्यमंत्री खरच राम भक्त असते तर सुरत गुवाहटी न जाता अयोध्येला गेले असते. फडणवीस कधी अयोध्येला गेले होते का? नाही. हे गेले म्हणून फडणवीस गेले. इकडे अवकाळी पण राम राज्य महाराष्ट्रात, देशात कधी येणार? शेतकरी रडतोय मग मागून मुख्यमंत्री जाऊन बोलतात. आम्ही वेळीच मदत केली होती.
घरात बसून कारभार करत असूनही तुमच्या मदतीने केले आणि पहिल्या पाचात महाराष्ट्र होता. जनतेला काय हव ? नागपूरला एअर बस प्रकल्प मविआ विदर्भात आणणार होतो पण तो यांनी गुजरातला हलवला आणि हे आमच्यावर आरोप करत आहेत. ८-९ वर्षे मोदींनी काय केले? बाप चोरणारी ही अवलाद न यांचे कुणी दैवत ना आदर्श. चंद्रकांत पाटील गेले होते का अयोध्येला? संघाला चंद्रकांत पाटलांचे म्हणणे पटतय का? शिवसेनाप्रमुखांचा अपमान तुम्ही करता. मी आव्हान देतो या मैदानात, मैदान मिळू नये म्हणून काड्या कसल्या करता. जनता जो निर्णय घेईल तो विनम्र पणे स्वीकारेल.
काँग्रेस मध्ये हिंदू नाहीत? आमच हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही. यांचे हिंदुत्व हे गोमूत्रधारी आहे. संभाजीनगरच्या सभे नंतर यांनी गोमूत्र शिंपडले. तिथे आलेली लोक काय माणसे नव्हती? मोहन भागवत मशिदीत गेले मी गेलो असतो तर? हिंदुत्वाच्या भाकड कथा मला सांगू नका या देशासाठी त्याग करणारा हिंदू.
२०१४ साली यांनी वचन मोडले. असले हिंदुत्व आमचे नाही. एका महिलेला जाऊन मारहाण केली मातृत्वासाठी उपचार करत होती तिच्या पोटात लाथा घातल्या. तिची तक्रार घ्यायला पोलीस तयार नाही. हे यांचे हिंदुत्व हे असे असेल तर मग गृहमंत्री फडतुस हा शब्द वापरला. फडतुस म्हणजे बिनकामाचा. देश मोकळा असायला हवा. क्रांतीकारक जे देशासाठी लढले ते भाजपला सत्तेवर बसवण्यासाठी नाही तर जनतेसाठी लढले. अन्याय करणाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही हे तुम्हाला ठरवायचे आहे. हे नाहीतर कोणीही येईल पण ते नको.
हिडेनबर्ग चला फालतु असेल मग इतके का हादरलात? राहुल गांधीजींना अपात्र ठरवले. सत्यपाल मलिक तर भाजपचे त्यांनी केलेल्या गौफ्यस्फोट मानणार की नाही त्यांनी भयंकर गोष्टी सांगितल्या. वाजपेयजी म्हणायचे सरकारे येतील जातील पण देश असायला हवा. सगळे गद्दारांना घेऊन कारभार सुरु आहे ही सत्तेची नशा आहे. गेल्या ८/९ वर्षात देशासाठी काय केले ते अगोदर सांगा.
उज्वला योजना किती ठिकाणी योग्य सुरु आहे? पीकविमा योजना, शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे येतायत? कुणाच्याही गावात लाभ नाहीत पण यांचे फोटो सगळीकडे दिसतायत योजना दिसत नाही. मोदींच्या अगोदर गँस सिलेंडर, डाॅलरचा भाव कुणाला आठवतात. आता आनंदाचा शिधा त्यातल्या कडधान्याला बुर्शी लागलीय. आता जिंकेपर्यंत थांबायचे नाही. मोदींना अडचणीचे मुद्दे आले की मग धार्मिक मुद्दे अचानक समोर येतात. यांच्या बुरख्याआड जो भेसूर चेहरा आहे तो जनतेने ओळखावा. तुम्ही मुठी आवळून सांगा अखेर पर्यंत सोबत आहात ( प्रचंड प्रतिसाद) पत्रकारांनी पण बघावे हे सगळे सभेला आलेले भाड्याचे लोक नाहीत विश्वास ठेऊन आले आहेत. आता जिंकेपर्यंत लढायचे.
जय हिंद जय महाराष्ट्र
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe