छत्रपती संभाजीनगर
Trending

पैठण, बिडकीन, सिल्लोड, कन्नड, खुलताबाद, वैजापूर, देवगाव रंगारी, करमाडसह जिल्ह्यातून जप्त केलेले 293 किलो अंमली पदार्थ पोलिसांनी जाळून नष्ट केले !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २७- जिल्हातील अंमलीपदार्थ कायद्यान्वये दाखल 19 गुन्हयातील 293 किलो अंमली पदार्थाचा 15 लाख किंमतीचा मुद्देमाल जाळून नष्ट करण्यात आला. पैठण, बिडकीन, सिल्लोड शहर, सिल्लोड ग्रामीण, कन्नड शहर, खुलताबाद, वैजापूर, शिल्लेगाव, देवगाव रंगारी, करमाड, सोयगाव आदी पोलिस स्टेशनच्या हद्दीतून पोलिसांनी हा माल जप्त केला होता. तो न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस कवायत मैदानच्या मागील बाजुस मोठा खड्डा करून त्यात टाकून जाळून नष्ट करण्यात आला.

मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनापासून जिल्हयात अंमलीपदार्थ विरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्हयात बेकायदेशीरपणे अंमली पदार्थ बाळगणा-या, विक्री करणा-या व चोरट्या पध्दतीने अंमलीपदार्थाची तस्करी करणा-या व्यक्तीच्या विरोध्दात विविध पोलिस ठाणे अतंर्गत गुन्हे दाखल करण्यात येत आहे. याच अनुषंगाने अंमली पदार्थ कायदा – 1985 अन्वये यावर्षी 06 गुन्हे दाखल करण्यात एकूण 36,37,980/- रुपये किंमतीचा अंमलीपदार्थाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याच अनुषंगाने जिल्हयातील पोलिस ठाणे ज्यात पैठण, बिडकीन, सिल्लोड शहर, सिल्लोड ग्रामीण, कन्नड शहर, खुलताबाद, वैजापूर, शिल्लेगाव, देवगाव रंगारी, करमाड, सोयगाव येथील अंमली पदार्थ कायदा – 1985 अन्वये दाखल 19 गुन्हयातील एकूण 293 किलो अंमली पदार्थाचा मुद्देमाल जप्त करण्यात येवून तो पोलिस मुख्यालय येथील अंमली पदार्थाच्या मध्यवर्ती गोडावूनमध्ये जमा करण्यात आला होता.

मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक यांच्या अध्यक्षेतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अंमली पदार्थ नाश समितीच्या माध्यमांतून हा संपूर्ण 19 गुन्हयातील जप्त करण्यात आलेला 293 किलो अंमली पदार्थ मुद्देमालाचा आढावा घेण्यात येवून अंमली पदार्थ नष्ट करण्यासाठी न्यायालयाची संपूर्ण कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून परवानगी प्राप्त करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक यांनी दिले होते. याच अनुषंगाने या गुन्हयातील जप्त अंमलीपदार्थाचे मुद्देमालाची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाने हा मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश निर्गमित केले होते.

आज दिनांक 27/9/2023 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये तसेच इतर विभाग ज्यात न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पथक, अग्निशमन पथक, प्रदूषण नियंत्रण पथक, वैधमापन पथकाच्या माध्यमांतून 19 गुन्हयांत जप्त करण्यात आलेला 293 किलो अंमलीपदार्थ जवळपास 15 लाख रुपये किंमतीचा हा संपूर्ण मुद्देमाल पंचासमक्ष पोलिस कवायत मैदानच्या मागील बाजुस मोठा खड्डा करून त्यात टाकून जाळून नष्ट करण्यात आला.

ही कार्यवाही मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश वाघ, पोलिस निरीक्षक, स्थागुशा, अण्णासाहेब वाघमारे, सुधीर मोटे, स.पो.नि. विजय जाधव, पो.उप.नि.  पोलिस अंमलदार दगडु जाधव, संतोष पाटील, सचिन ढवळे, प्रमोद खांडेभराड, दीपक सुरोसे, रविंद्र लोखंडे, कासम शेख, नरेंद्र खंदारे, गणेश सोनवणे, संतोष दमाळे, शेख अख्तर, संगीता वासडीकर, जनाबाई चव्हाण, संगिता वासडीकर यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!