छत्रपती संभाजीनगर
Trending

छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा ३२ लाखांचा घोटाळा, MH ट्रेडींगने वर्षाला ६० टक्के परताव्याचे आमिष दाखवले !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा ३२ लाखांचा घोटाळा उघडकीस आला आहे. MH ट्रेडींग या फर्मने वर्षाला ६० टक्के परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांची फसवणूक केली. सुरुवातीला तगडा परतावा देवून विश्वास संपादन केला व नंतर फसवणूक केली.

31/05/2022 पासून ते जून 2023 पर्यंत एम.एच. ट्रेडींग कंपनी खिवसरा पार्क उल्कानगरी छत्रपती संभाजीनगर परिसरात हा घोटाळा उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हनुमंत शिंदे व त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवानंद पांडुरंग पेंडलवार (वय 60 वर्ष, व्यवसाय- सेवानिवृत, रा. रो. हाऊस क्रं. सी-14 मनाली रेसिडेंसी वाळुज महानगर-1 छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, यातील फिर्यादी यांनी 11,00,000/- रुपयांची गुंतवणुक केली. आरोपी यांनी फिर्यादीस जून /2023 पर्यंत 4,63,000/- रुपयांचा परतावा दिलेला असून त्यानंतर त्यांनी परतावा देणे बदं केला.

तसेच फिर्यादी सह 1) केशव सखाराम वाघ यांची 4,50,000/-रुपये, 2) पोपट नंदु शिंदे यांची 8,00,000/- रुपये 3) सरोज प्रमोद सरकले यांची 7,00,000/- रुपये, 4) पल्लवी नितीन वर्णे यांची 2,00,000/- रुपये अशी एकूण 32,50,000/- रुपये गुंतवणुक करण्यास लावून गुंतवणुक रक्कमेवर 30 ते 60% प्रती वर्ष परतावा देण्याचे आमिष दाखवले. तसेच त्यांना मुदत ठेवीचे करारनामे करून देवून सदर गुंतवणुक रक्कमेला आधार म्हणून त्यांना आरोपींनी त्याचे MH ट्रेडींग या फर्मच्या खाते व वैयक्तिक खातेचे धनादेश दिले.

लोकांना परतावा व मुद्दल रक्कम परत न करता फिर्यादीसह साक्षीदारांची एकूण 32,50,000/- रुपये रकमेची हनुमंत शिंदे व त्यांच्या पत्नीने आर्थिक फसवणुक केली. तसेच त्यांनी आणखी ब-याच लोकांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे.

याप्रकरणी जवाहर नगर पोलिस स्टेशनमध्ये हनुमंत शिंदे व त्यांच्या पत्नीवर गु.र.न.-266/2023 कलम 406, 420,34 भादवि सह कलम 3,4 MPID नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी चंदन यांच्याकडे दिला आहे.

Back to top button
error: Content is protected !!