नांदेड, दि. २१- उत्तर रेल्वेने प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून अमृतसर-हजूर साहिब नांदेड – अमृतसर दरम्यान विशेष गाडीच्या 04 फेऱ्या करण्याचे ठरविले आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
1. गाडी क्रमांक 04640 अमृतसर-हजूर साहिब नांदेड विशेष गाडी : ही गाडी अमृतसर येथून दिनांक 22 आणि 23 डिसेंबर, 2022 ला सकाळी 04.25 वाजता सुटेल आणि जालंधर, राजपुरा, पानिपत, न्यू दिल्ली, आग्रा, ग्वालीअर, इटारसी, खांडवा, अकोला, वाशीम, हिंगोली, पूर्णा मार्गे हजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 15.20 वाजता पोहोचेल.
2. गाडी क्रमांक 04639 हजूर साहिब नांदेड – अमृतसर विशेष गाडी : ही गाडी हजूर साहिब नांदेड येथून दिनांक 23 आणि 24 डिसेंबर, 2022 ला रात्री 23.10 वाजता सुटेल आणि पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, ग्वालीअर, आग्रा, न्यू दिल्ली, पानिपत, राजपुरा, जालंधर मार्गे अमृतसर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 09.30 वाजता पोहोचेल.
या गाडीत द्वितीय श्रेणी शय्या, तृतीय श्रेणी वातानुकुलीत, जनरल असे 20 डब्बे असतील.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe