राजकारण
Trending

छगन भुजबळांचा फोटो मॉर्प करणार्‍या भाजप आमदार अतुल भातखळकरांवर कारवाई करा

- जयंत पाटील

नागपूर दि. २१ डिसेंबर – भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित करून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. याकडे माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज सभागृहाचे लक्ष वेधले.

सभागृहातील सदस्यच दुसऱ्या सन्माननीय आणि ज्येष्ठ सदस्यांचा फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर प्रसारित करून ट्रोल करत असेल तर ते योग्य नाही. गृहमंत्री त्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवालही जयंत पाटील यांनी केला.

छगन भुजबळ यांचे मोबाईलमधील ते छायाचित्र दाखवत हे अतिशय गंभीर आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇

https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne

दरम्यान राजकीय नेत्यांनी अशा गोष्टी करु नये त्यांनी सोशल मीडियावर संहिता पाळाव्यात असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!