महाराष्ट्र
Trending

खाजगीकरणावर मंथन: विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे ४५ वे राज्यव्यापी अधिवेशन शनिवारी अमरावतीत ! महावितरण, महापारेषण, महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांची हजेरी !!

अमरावती, दि.१० फेब्रुवारी २०२३- मराराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे ४५ वे राज्यव्यापी अधिवेशन शनिवार व रविवार दिनांक ११ व १२ फेब्रुवारीला अमरावती येथील हॉटेल प्राईम पार्क येथे आयोजित केले असून, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या अधिवेशनास महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि सूत्रधारी कंपनीतील वर्ग १ आणि वर्ग २ चे अधिकारी उपस्थित रहाणार आहे.

विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे (भाप्रसे) यांच्याहस्ते उद्घाटन होणाऱ्या या अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महापारेषणचे संचालक (मासं) सुगत गमरे राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यकारी संचालक महावितरण अरविंद भादीकर, भिमाशंकर मंता कार्यकारी संचालक (मासं) महानिर्मिती,कार्यकारी संचालक,प्रादेशिक संचालक,नागपूर सुहास रंगारी, मुख्य अभियंता महावितरण अमरावती परिमंडल ज्ञानेश कुलकर्णी राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटना ही महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातील अग्रगण्य शासकीय कंपन्यातील वित्त व लेखा, मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती व तंत्रज्ञान, दक्षता व सुरक्षा, जनसंपर्क व विधी विभागातील अतांत्रिक अधिका-यांची नेतृत्व करणारी बलाढ्य संघटना आहे.

संघटनेच्या राज्यव्यापी वार्षीक ४५ व्या अधिवेशनात ऊर्जा क्षेत्रातील, तिन्ही कंपन्यांची सद्यस्थिती, खाजगीकरण व वीज उद्योग आर्थिक सक्षमीकरण यावर विचार मंथन होणार असल्याने हे अधिवेशन महावितरण,महापारेषण आणि महानिर्मिती या तिनही कंपन्यांच्या वाटचालीत दिशादर्शक ठरेल असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष प्रवीण बागूल, सरचिटणीस संजय खाडे, संघटन सचिव प्रवीण काटोले आणि केंद्रीय कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.

हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अधिकारी संघटनेच्या  अमरावती कार्यकारिणीचे अध्यक्ष नितीन नांदुरकर, सचीव फुलसिंग राठोड अकोला कार्यकारिणी अध्यक्ष अनंत साबळे, सचिव अमोल बाहेकर,प्रशांत लहाने,यज्ञेश क्षीरसागर,प्रमोद कांबळे आणि सर्व सदस्य झटत आहे.

संतांच्या भूमीत, अमरावती नगरीत संपन्न होणारे ४५ व्या वार्षिक अधिवेशनास सर्व सभासदांनी पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे सरचिटणीस संजय खाडे यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!