महाराष्ट्र
Trending

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनसंदर्भातील शासन निर्णय जारी !

एकूण रुपये १३३२३.२४ लाख एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता

Story Highlights
  • केंद्र शासनाकडून विहीत कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन अदा करणे शक्य व्हावे, याकरिता हा शासन निर्णय

मुंबई, दि. १० – अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. जानेवारीच्या मानधनासंदर्भातील हा शासन निर्णय फेब्रुवारीमध्ये जारी करण्यात आला. एकूण रुपये १३३२३.२४ लाख एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने काढलेल्या या शासन निर्णयात म्हटले आहे की, आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. केंद्र शासनाकडून विहीत कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन अदा करणे शक्य व्हावे, याकरिता अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २ जून २०१७ रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका यांचे माहे जानेवारी, २०२३ या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता एकूण रुपये १३३२३.२४ लाख एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

लेखाशिर्ष व बाब (रुपये लाखात)

२२२६- पोषण आहार ०२- पोषक अन्न व पेये यांचे वितरण १०१- विशेष पोषण आहार कार्यक्रम (०८) (०१) एकात्मिक बाल विकास सेवा योजना (सर्वसाधारण खर्च) केंद्र हिस्सा ६० टक्के (२२२६ १९०९) ०२- मजूरी – विद्यमान तरतूद २०२२-२३ – ४९९०२.७२ – यापूर्वीची वितरीत तरतूद – ४२२०९.७०, या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी – ४२२०.९७

(०८) (०२) एकात्मिक बाल विकास सेवा योजना (सर्वसाधारण खर्च), राज्य हिस्सा ४० टक्के (२२३६ १९१८), विद्यमान तरतूद -३३२६८.२८, यापूर्वीची वितरीत तरतूद – २८१३९.८०, या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी – २८१३.९८

(०८) (०५) अंगणवाडी सेवा, अतिरिक्त राज्य हिस्सा १०० टक्के (२२३६ १९४५), ०२ मजुरी, विद्यमान तरतूद –  ७३८७६.०५, यापूर्वीची वितरीत तरतूद – ६२८८२.९०, या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी – ६२८८.२९

एकूण – विद्यमान तरतूद – 157047.05, यापूर्वीची वितरीत तरतूद – 133232.40, या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी – 13323.24

अंगणवाडीसंदर्भातील खालील बातम्याही वाचा-

अंगणवाड्यांसह विविध ठिकाणी जागरूक पालक सुदृढ बालक अभियान, पथकांची स्थापना ! पथकांसोबत स्थानिक आशा व अंगणवाडी सेविका असणार !!

अंगणवाडी सेविकांच्या हल्लाबोल मोर्चाने एकात्मिक बाल विकास कार्यालय दणाणले ! 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपाची हाक !!

आशा व अंगणवाडी सेविकांच्या मार्फत मोबाईलद्वारे गावोगावी ऑनलाईन कार्यक्रम राबवण्याचे निर्देश !

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठवला !

अंगणवाड्यांचे समायोजन होणार: ग्रामीण प्रकल्पामधील जी अंगणवाडी केंद्र नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात आहेत त्यांचे नागरी प्रकल्पात समायोजन करण्याचा निर्णय !

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाने मुंबईचे आझाद मैदाण दणाणले ! मानधन व पेन्शनसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक !!

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा दिलासादायक निर्णय घेऊ, लवकरच बैठक घेण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश !!

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता ! मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विम्यावर सकारात्मक निर्णय घेणार !!

अंगणवाडी सेविका, आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मजबूत संपर्क जाळ्याद्वारे अधिकाधिक स्थलांतरित लोकांपर्यंत पोहोचता येणार !

अंगणवाडी पर्यवेक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटलांसह अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय !!

अंगणवाडी, ग्राम पंचायतीमध्ये ‘सुकन्या समृद्धी योजनेत’ खाते उघडण्यासाठी प्रबोधन !

Back to top button
error: Content is protected !!