महाराष्ट्र
Trending

वाशीत पत्त्याच्या क्लबवर रेडमधील गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५ लाख किंवा सेकंड हॅन्ड गाडीची डिमांड ! परंड्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस शिपायावर गुन्हा !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ – तक्रारदार यांना सन 2019 मध्ये जुगाराच्या गुन्ह्यात मदत केली आणि कलम 353,307 मध्ये आरोपी केले नाही म्हणून रू 5,00,000/- (पाच लाख रुपये ) किंवा सेकंड हॅन्ड गाडी लाचेची मागणी करून तडजोडीअंती रू 90,000/- (नव्वद हजार रुपये ) लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याच्या आरोपावरून परंड्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस शिपाईवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशीत पत्त्याच्या क्लबवर रेड टाकण्यात आली होती, या प्रकरणाची किनार याला आहे.

भगवान भरत नाईकवाडे (सहायक पोलीस निरीक्षक, वर्ग -2, पोलीस ठाणे परंडा, जिल्हा धाराशिव) व  सागर वसंतराव कांबळे (पोलीस शिपाई, वर्ग -3, पोलीस ठाणे परंडा, जिल्हा धाराशिव) अशी आरोपींची नावे आहेत.

भगवान भरत नाईकवाडे, सहायक पोलीस निरीक्षक हे दहशतवादी विरोधी पथक, धाराशिव येथे सन 2019 मध्ये नेमणूकीस असताना त्यांनी वाशी येथे पत्त्याच्या क्लब वर रेड करून त्यामध्ये यातील तक्रारदार व इतरांना आरोपी केले. तसेच त्याच दिवशी त्यांनी सदर जुगाराच्या गुन्ह्यातील व वाशी येथील इतर लोकांविरुद्ध कलम 353, 307 चा गुन्हा दाखल केला. परंतु कलम 353,307 च्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांचा सहभाग नसल्याने त्यांना आरोपी केले नव्हते.

दिनांक 14.04.2023 रोजी भगवान भरत नाईकवाडे, सहायक पोलिस निरीक्षक व सागर वसंतराव कांबळे, पोलीस शिपाई यांनी तक्रारदार यांना सन 2019 मध्ये जुगाराच्या गुन्ह्यात मदत केली आणि कलम 353,307 मध्ये आरोपी केले नाही म्हणून रू 5,00,000/- (पाच लाख रुपये ) किंवा सेकंड हॅन्ड गाडी अश्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती रू 90,000/- (नव्वद हजार रुपये ) लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. परंतु यातील आरोपींना संशय आल्याने त्यांनी तक्रादार यांचेकडून लाच रक्कम स्वीकारली नाही. म्हणून सदर आरोपींवर पोलीस स्टेशन परांडा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी :- सिद्धाराम म्हेत्रे, पोलीस पोलीस उप अधीक्षक, धाराशिव, सापळा पथक – पोलीस निरीक्षक विकास राठोड, पोलीस अमलदार दिनकर उगलमोगले, मधुकर जाधव, अर्जुन मारकड, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, विशाल डोके यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!