गंगापूरछत्रपती संभाजीनगर
Trending

वैजापूर गंगापूर हायवेवरील हॉटेलमध्ये कमरेला गावठी कट्टा लावून जेवायला आला अन् पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! मांजरी फाट्याच्या दिशेन अंधारात पाठलाग करून बेड्या ठोकल्या !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १८- वैजापूर गंगापूर हायवेवरील हॉटेलमध्ये कमरेला गावठी कट्टा लावून जेवायला आला अन् पोलिसांनी मुसक्या आवळल्या. गावठी कट्टासह दोन जिवंत काडतूस सोबत बाळगणार्या आरोपीला गंगापूर पोलीसांनी शिताफिने जेरबंद केले. मांजरी फाट्याच्या दिशेन अंधारात पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. अनिल कचरू साळुंके (३० वर्षे, रा. जाधवगल्ली ता. गंगापूर) असे आरोपीचे नाव आहे.

दिनांक 17/10/2022 रोजी रात्री 23:30 वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले हे त्यांच्या पथकासह गंगापूर शहरात नवरात्री दांडीयाच्या अनुषंगाने परिसरात पेट्रालिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वैजापूर ते गंगापूर हायवे वरती असलेल्या एका हॉटेलमध्ये एक व्यक्ती हा जेवण करण्यासाठी आला असून त्यांची हालचाल ही संशयास्पद असून त्याच्या कमरेला गावठी कट्टा लावलेला आहे.

या माहितीच्या आधारे पो. नि. सत्यजीत ताईतवाले व त्यांच्या पथकांने तात्काळ हॉटेलच्या दिशेने धाव घेवून हॉटेलच्या परिसरात अंधारात आडोशाला सापळा लावला. यावेळी हॉटेलच्या बाहेर येताना जण हा सापळ्यातील पथकाला दिसला. त्याची हालचाल ही संशयास्पद दिसून आल्याने पोलिसांनी त्याच्या दिशेने धाव घेतली असता पोलिसांची हालचाल पाहताच त्याने वैजापूर रोडने अंधाराचा फायदा घेत मांजरी फाटयाच्या दिशेन सुसाट वेगात धूम ठोकली. परंतु गंगापूर पोलिसांनी सुध्दा अंधारात त्याचा कसून पळत पाठलाग करून त्याला थोड्याच अंतराव असलेल्या मांजरी फाटयावर शिताफिने पकडले.

यावेळी त्याला विश्वासात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अनिल कचरू साळुंके (३० वर्षे, रा. जाधवगल्ली ता. गंगापूर) असे सांगितले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक स्टिलच्या धातूचा काळया रंगाचा गावठी कट्टा (पिस्टल) व दोन जिवंत काडतुस (राऊंड) अवैधरित्या विनापरवाना जवळ बाळगतांना मिळून आला. गावठी कट्टा व काडतुस जप्त करण्यात आली आहेत. त्याच्या विरुध्द पोलीस ठाणे गंगापूर येथे कलम 3, 25 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गंगापूर पोलीस करित आहेत.

तसेच आरोपी हा पोलीसांना दिनांक २७/०८/२०२३ रोजी गंगापूर शहरातील अहिल्यानगर येथील ०३ वर्षीय मुलाचा गावठी कट्यातून त्याला गोळी लागून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या गुन्हयातील मृत मुलाचे वडील राहुल कल्याण राठोड याला सुध्दा याच आरोपीने गावठी कट्टा दिल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नमुद गुन्हयातील भादंवी कलम ३०४ सह ३,७,२५ भारतीय हत्यार कायद्यान्वये दाखल गुन्हयात गंगापूर पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याचे विरुद्ध आतापर्यत अवैध शस्त्र बाळगणे, विक्री करणे या सारखे गंगापूर व श्रीरामपूर येथे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक, वैजापूर चार्ज, उपविभागीय पोलीस अधिकारी, गंगापूर, यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजीत ताईतवाले, पोलीस निरीक्षक, दीपक औटे,  शकील शेख पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार अमोल कांबळे, अभिजीत डहाळे, राठोड, विजय नागरे, अजित नागलोत, राहुल वडमारे, मनोज नवले बाबासाहेब खाडे यांनी पार पाडली..

Back to top button
error: Content is protected !!