दौलताबाद पोलिस स्टेशन हद्दीतील करोडी गावात राडा ! ग्रामपंचातसाठी पॅनलला मतदान केले नाही म्हणून मारहाण !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनलला मतदान केले नाही म्हणून चौघांनी एकाला मारहाण केल्याची घटना दौलताबाद पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. ही घटना दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेदरम्यान करोडी ग्रामपंचायतच्या बाजुला असलेल्या महापुरुषाच्या पुतळ्याजवळ घडली.
विष्णू शेषराव गायकवाड (वय 35 वर्षे), बाजीराव गोरखनाथ गोल्हार (35), रवि शेषराव गायकवाड (30), संजय सोनवणे (२८, सर्व रा. करोडी) अशी आरोपींची नावे आहेत. रवि यादवराव जाधव (वय ३५, व्यवसाय- शेती, रा. करोडी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे जखमीचे नाव असून त्यांनी दौलताबाद पोलिसांत फिर्याद दिली आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २२ डिसेंबर रोजी रवि यादवराव जाधव हे करोडी ग्रामपंचायतच्या रस्त्याचे समोरील रोडवरून जात होते. यावेळी रस्त्यात थांबलेला विष्णू शेषराव गायकवाड हा रवि यादवराव जाधव यांना म्हणाला की आमच्या पॅनलला मतदान का केले नाही ? यानंतर त्याने रवि यादवराव जाधव यास शिवीगाळ करून मारहाण केली.
बाजुला थांबलेला बाजीराव गोरखनाथ गोल्हार, रवि शेषराव गायकवाड, राहुल संजय सोनवणे हे धावत आले. सर्वांनी रवि यादवराव जाधव यांना लाथा बुक्यांने बेदम मारहाण केली. विष्णू गायकवाड याने धारदार वस्तूने रवि यादवराव जाधव यांच्या डावे डोळ्याच्या भवईवर जोराने मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीवरून विष्णू शेषराव गायकवाड (वय 35 वर्षे), बाजीराव गोरखनाथ गोल्हार (35), रवि शेषराव गायकवाड (30), संजय सोनवणे (२८, सर्व रा. करोडी) यांच्यावर दौलताबाद पोलिस स्टेशनमध्ये गुरन १९४/२०२२ कलम ३२३, ३२९, १४३, १४७, ५०४, ५०६, ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.उप नि. बचाटे हे पुढील तपास करत आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe