वैजापूर
Trending

वैजापूर, चाळीसगाव, नांदगाव, येवला परिसरातून चोरी करणारे शिऊरचे चोरटे जेरबंद !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३० – वैजापूर, चाळीसगाव, नांदगाव, येवला परिसरातून चोरी करणारे शिऊरच्या दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात आले. या दोन चोरट्यांकडून चोरीचा ७,७५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशाल उर्फ तुषार दादासाहेब पगार (वय २४ वर्षे रा. आढाववस्ती, शिऊर ता. वैजापूर) ऋषिकेश नानासाहेब हारदे (वय 29 वर्षे रा. शिऊर ता. वैजापूर) अशी आरोपींची नावे आहेत. ९ मोटारसायकल, एक बुलेट ६ विद्युतपंप, ५ स्टार्टर आदी मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केला.

पोलीस ठाणे शिऊर येथील प्रभारी अधिकारी स.पो.नि. संदिप पाटील हे त्यांच्या पथकासह, शिऊर परिसरातील शेतक-यांच्या विहीरीवरिल चोरी गेलेले विद्युतपंप, स्टार्टर आदींची चोरी करणा-या चोरट्यांची माहिती घेत असताना त्यांना गोपनीय बातमीदार मार्फत शिऊर परिसरातील विशाल उर्फ तुषार दादासाहेब पगार हा अशा प्रकारची चोरी करत असल्याची माहिती मिळाली.

यावरून स.पो.नि. संदिप पाटील व त्यांच्या पथकांने संशयित याचा कसोशिने शोध घेवून त्यास शिताफिने त्याच्या घरी आढाव वस्ती, शिऊर येथे ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेवून गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस करता तो सुरुवातीला उडवा उडवीचे उत्तरे पोलीसांना देवू लागला.

यावरून त्याचेवर अधिक संशय बळावल्याने त्यास कसून चौकशी करता त्यांने त्याचा साथीदार ऋषिकेश नानासाहेब हारदे (रा. शिऊर) याचे सोबत मिळून चोरी केल्याचे कबुल केले. या दोघांनी मिळून चाळीसगाव, नांदगाव, येवला, वैजापूर परिसरातून मोटरसायकल व बुलेट यासह शिऊर व परिसरातून ६ विद्युतपंप, ५ स्टार्टर, ३ पिटर, चोरी केलेला जवळपास ७,७५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल लपवून ठेवलेला पोलिसांना काढून दिला.

यावरुन विशाल उर्फ तुषार दादासाहेब पगार (वय २४ वर्षे रा. आढाववस्ती, शिऊर ता. वैजापूर) ऋषिकेश नानासाहेब हारदे (वय 29 वर्षे रा. शिऊर ता. वैजापूर) यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास शिऊर पोलीस करित आहेत.

ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक, वैजापूर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप पाटील, पो.उप.नि. अंकुश नागटिळक, योगेश पवार, सफौ / आर. आर. जाधव, टि.पी. पवार, पोलीस अंमलदार गणेश गोरक्ष, अविनाश भास्कर, सविता वरपे, विशाल पैठणकर, गणेश जाधव, देवराव तायडे, संभाजी आंधळे, नितीन ढवळे, सुभाष ठोके यांनी केली आहे.

दरम्यान, मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी जिल्हयातील शेतक-यांच्या विहीरीवरिल विद्युत पंप, स्टार्टर आदी साहित्य चोरी करणा-यांचा शोध घेवून त्यांना जेरबंद करण्याबाबत सूचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या आहेत.

Back to top button
error: Content is protected !!