छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

छत्रपती संभाजीनगरात कर थकवणाऱ्या ३३ मालमत्ता धारकांवर जप्ती कारवाईचा बडगा, उद्याही धडाका सुरू राहणार !

मालमत्ता कर भरण्यासाठी वार्ड कार्यालय सुरू राहणार

संभाजीनगर लाईव्ह, दि.३० डिसेंबर – मालमत्ता कर थकवणार्यांविरोधात महानगरपालिकेने मोहीम हाती घेतली आहे. आज ३३ मालमत्ता धारकांवर कारवाई करण्यात आली.

महानरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व नऊ झोन कार्यालय अंतर्गत रहिवासी व व्यवसायिक मालमत्ता व पाणी पट्टी नियमित भरणा करण्यासाठी सतत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. थकीत मालमत्ता कर व पाणी पट्टी बाबत पालिकेच्या वतीने सबधितांना नोटिसा देखील देण्यात आल्या आहेत.

आज, ३० डिसेंबर रोजी प्रशासक यांच्या आदेशानुसार झोन न १ ते ०९ अंतर्गत एकूण ३३ मालमत्ता धारकाकडून थकीत मालमत्ता कर व पाणी पट्टी वसुली ची कारवाई करण्यात आली. यात व्यवसायिक मालमत्ता – वाईन शॉप, हॉटेल इत्यादी मालमत्ताचा समावेश आहे.

सदरील कारवाई उद्या, रविवारीही सुरू राहणार असून थकीत मालमत्ता कर व पाणी पट्टी भरणा करण्यासाठी सर्व वार्ड कार्यालय उद्या सुरू राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!