छत्रपती संभाजीनगर
Trending

औरंगाबादेत हिंदुच्या श्रद्धा स्थानाची समाज कंटकाकडून विटंबना ! केक कापून आरडाओरडही केली, पोलिसांचे शांततेचे आवाहन !!

दोघांवर गुन्हा दाखल

संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – हिंदुच्या श्रद्धा स्थानाजवळ वाढदिवसाचा केक कापून मोठ-मोठ्याने आरडा ओरड सुरु असताना स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी दोघांनी श्रद्धा स्थानाच्या समोर व ओट्यावर आक्षेपार्ह वस्तू फेकून पळ काढला. याप्रकरणी स्थानिकांच्या तक्रारीवरून एमआईडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे.

तनवाणी प्लॉटिंग मूर्तीजापूर म्हडा कॉलनी औरंगाबाद परिसरात ही घटना घडली. ४ जानेवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणने आहे.

यासंदर्भात स्थानिक तक्रारदाराने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, तनवाणी प्लॉटिंग मूर्तीजापूर म्हडा कॉलनी औरंगाबाद परिसरातील हिंदुच्या श्रद्धा स्थानाजवळ आरडाओरड चालू असल्याचा आवाज आला. त्यामुळे स्थानिक तक्रारदार त्याठिकाणी गेले असता त्या ठिकाणी काही मुले केक कापून वाढदिवस साजरा करत होते.

स्थानिक तक्रारदाराने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुलांनी पुन्हा जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरवात केली. त्यावेळेस सदर ठिकाणी कॉलनीतील दहा ते पंधरा जण त्याठिकाणी आले. सर्वांनी मिळून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी श्रद्धा स्थानाच्या जवळच्या ओट्यावर सिध्दार्थ सुनील खंडागळे व पाडुरंग निंबाळकर (रा. म्हाडा कॉलनी) व इतर चार ते पाच जण त्यांच्या जवळ असलेल्या वस्तू श्रद्धास्थानाच्या समोरील ओट्यावर टाकून पळून गेले. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार स्थानिकांनी पोलिसांकडे केली आहे.

त्यानुसार सिध्दार्थ सुनील खंडागळे व पाडुरंग निंबाळकर (रा. म्हाडा कॉलनी) या दोघांवर एमआईडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!