नाशिक, दि. २ – वडिलांच्या नावे असलेल्या शेत जमिनीच्या नमुना १२ मध्ये झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी १८०००० रुपयांची मागणी करून तडजोडीअंती १ लाख ठरले. यातील ५० हजारांची लाच घेतल्या प्रकरणी नाशिक भूमी अभिलेख कार्यालयातील जिल्हा अधिक्षक आणि कनिष्ठ लिपिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
महेशकुमार महादेव शिंदे (जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, अतिरिक्त कार्यभार उपसंचालक भूमि अभिलेख नाशिक, जि. नाशिक), अमोल भीमराव महाजन (कनिष्ठ लिपिक, जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख कार्यालय नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांनी ५०,०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्याने त्यांच्या विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
यातील तक्रारदार यांच्या वडिलांचे नावे असलेल्या शेत जमिनीचा भूमि अभिलेख कार्यालयाने तयार केलेला हिसा नमुना १२ मध्ये लिखाण प्रमादची चूक झालेली असून सदरची चूक दुरुस्तीचे आदेश देण्यासाठी महेशकुमार महादेव शिंदे, जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, अतिरिक्त कार्यभार उपसंचालक भूमि अभिलेख नाशिक, जि. नाशिक यांनी तक्रारदार यांच्याकडे १,८०,०००/- रुपये लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिली.
या तक्रारीवरुन ला. प्र. वि. नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा रचला. सापळा कारवाई दरम्यान महेशकुमार महादेव शिंदे, जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, अतिरिक्त कार्यभार उपसंचालक भूमि अभिलेख नाशिक, जि. नाशिक यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती १,००,०००/- रुपये लाचेची मागणी केली व अमोल भीमराव महाजन, कनिष्ठ लिपिक, जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख कार्यालय नाशिक यांनी तक्रारदार यांना सदर लाचेची रक्कम देण्यास प्रोत्साहित केले.
तसेच मागणी केलेल्या १,००,०००/- रुपये लाचेच्या रक्कमेपैकी ५०,०००/- रूपये लाचेची रक्कम महेशकुमार महादेव शिंदे यांनी तक्रारदार यांचेकडून जिल्हा अधिक्षक, उप अधिक्षक, भूमि अभिलेख, नाशिक यांच्या कार्यालयीन दालनात स्वीकारल्याने त्यांना पकडण्यात आले. दोघांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाणे, नाशिक शहर गुरनं. १७/२०२३ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe