हॉटेलमधील ग्राहकांचे भांडण सोडवण्यास गेलेल्या शेजाऱ्याला मिरचीची पूड टाकून लाकडाने मारहाण ! नांदेडच्या हॉटेलचालक बाप लेकावर गुन्हा दाखल !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – ग्राहकांमध्ये सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या शेजार्याला हॉटेलच्या मालक बाप लेकाने मिरचीची पावडर टाकून लाकडाने मारहाण केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली.
व्यंकटी शिंदे व बंटी शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. शेख उमदु पि. शेख पिरसाब (वय 40 वर्षे व्यवसाय टायर रिमोल्ड दुकान, रा. रहिमपुर ता.जि.नांदेड) यांनी पोलिसांना सांगितलेली हकीकत अशी की, त्यांचे धनेगाव पंकज नगर येथे टायर रिमोल्ड करण्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकाना शेजारी बंटी शिंदे यांचे हॉटेल आहे. काल दि. 19/02/2023 रोजी सायंकाळी 06.00 वाजेच्या सुमारास शेख उमदु पि. शेख पिरसाब हे नेहमी प्रमाणे दुकानात काम करीत असताना त्यांच्या सोबत त्यांचा मित्र जफर अन्सारी (रा. दुधडेअरी, रहीमपूर ता. जि. नांदेड) होता.
त्यांच्या दुकानाच्या शेजारी बंटी शिंदे यांच्या हॉटेलच्या पाठीमागून भांडणाचा मोठ मोठ्याने आवाज येत होता. त्यामुळे शेख उमदु पि. शेख पिरसाब यांनी हॉटेलच्या पाठीमागे जावून पाहिले असता हॉटेलमधील ग्राहक हे दारू पिऊन भांडण करीत होते. शेख उमदु पि. शेख पिरसाब यांनी त्यांना भांडण का करता असे विचारले असता तेथील हॉटेल चालक बंटी याचे वडील व्यंकट शिंदे यांनी तुला काय करायचे तू इथे कशाला आलास असे म्हणून त्यांनी लाकडाच्या ढिगा-यातील लाकुड हातात घेवून शेख उमदु पि. शेख पिरसाब यांना डोक्यात मारून जखमी केले.
तेव्हा त्यांचा मित्र जफर अन्सारी हा मध्यस्ती करण्यासाठी आला असता त्यास पण व्यंकट शिंदे यांनी हातात मिरची पावडर घेवून शेख उमदु पि. शेख पिरसाब यांच्या मित्राच्या अंगावर फेकली व हातातील लाकडाने जफर यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर मुक्का मार दिला. तेव्हा बंटी शिंदे हा तेथे आला व त्याने दोघांना शिवीगाळ केली. तुम्ही पुन्हा इकडे आलात तर तुम्हाला बघून घेतो असे म्हणून धमकी दिली.
याप्रकरणी शेख उमदु पि. शेख पिरसाब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये व्यंकटी शिंदे व बंटी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe