मोसंबी शेतकऱ्यांना समृद्धी देणारं पीक: डॉ एम बी पाटील
प्रगतशील शेतकरी दिलीप गोरे, कृषीभूषण शिवराम घोडके, संतोष शिंगारे यांनी केले मार्गदर्शन
बीड, दि. २६ : मोसंबी हे शेतकऱ्यांना समृद्ध बनविणारे पीक असून त्याची महाराष्ट्रात सर्वत्र लागवड केली जाते. न्यूसेलर सारख्या योग्य वाणाची निवड केल्यास बहाराचे योग्य नियोजन केल्यास झाडांना येऊन योग्य ताण दिले आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर केल्यास मोसंबी पिकामध्ये चांगले उत्पादन मिळून शेतकऱ्यांची उन्नती साधली जाऊ शकते असे प्रतिपादन फळ संशोधन केंद्र हिमायतबाग (छत्रपती संभाजीनगर) डॉ. एम. बी पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे आयोजित केलेल्या कृषी महोत्सवामध्ये तिसऱ्या दिवशी शेतकरी चर्चासत्रामध्ये प्रमुख मार्गदर्शक पदावरून डॉ. एम. बी पाटील यांनी बोलत होते. यावेळी मंचावर भूषण शिवराम घोडके, पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक, संतोष शिंगारे, राज्य समन्वयक कांबळे, गुणवंत आगळे, तालुका कृषी अधिकारी गंडे, जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना डॉ. एम. बी पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी फळबाग शेतीकडे वळण्याची गरज आहे. आपल्याकडे भरडधान्याचे पीक मागे पडून ऊस शेती मोठी वाढ झाली. शेतकऱ्यांनी सध्या उसाच्या पुढे गेले पाहिजे. गुणात्मकदृष्टया आणि आर्थिकदृष्टया शेतकऱ्याची उन्नती साधण्यासाठी शेतकऱ्यांनी फळबाग शेती व्यवसाय करण्याचे आवाहनही डॉ. एम. बी पाटील यांनी केले.
दरम्यान, चर्चासत्राचे प्रस्ताविक करतांना आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी कृषी महोत्सवामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाचे तसेच उभारण्यात आलेल्या स्टॉलची माहिती व पुढील दिवसात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रम याविषयी माहिती सांगितली. या चर्चासत्राला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले दिलीप गोरे माजी नगराध्यक्ष यांनी सामाजिक- राजकीय क्षेत्रात काम करत असतानाच आधुनिक पद्धतीने केलेल्या शेतीच्या प्रयोगाविषयी उपस्थितांना माहिती सांगितली. या चर्चासत्राला सेंद्रिय शेती कृषीभूषण शिवराम घोडके, पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक संतोष शिंगारे, राज्य समन्वयक कांबळे, गुणवंत आगळे तालुका कृषी अधिकारी, गंडे, जाधव, तसेच या चर्चासत्राला मोठ्या प्रमाणावर शेतकरी महिला आणि कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होता.
विविध परिसंवाद
कृषी महोत्सव 2023 मध्ये दि 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकरी चर्चा सत्रात सकाळी 11. 00 वा. गोविंद मुंडे, प्रमुख सीताफळ सांशोधन केंद्र, अंबाजोगाई हे सीताफळ लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योग या बाबत मार्गदर्शन करणार आहेत. दु 12.00 वा शेतकरी उत्पादक कंपनी कार्य व खरेदी विक्री केंद्र योजनेचा लाभ घेणे बाबत अभिमान अवचार हे मार्गदर्शन करणार आहेत तसेच पंतप्रधान, भारत सरकार हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ‘शेतकरी सन्मान निधी” च्या १३ व्या हप्त्या चे वाटप ऑनलाईन पद्धतीने दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता करणार आहेत. शेतकऱ्यांना सदरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषि प्रदर्शन, बीड येथे ऑनलाईन पद्धतीने दाखविण्यात येणार आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe