घाटीरोडवर मोपेडचा धक्का लागल्याने म्हाडाच्या कॉम्प्यूटर ऑपरेटरला मारहाण ! पडेगावच्या आरोपीने साथीदार जमवून केली मारहाण !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – मोपेडचा धक्का लागल्याने हळू चालवा असे म्हणताच मारहाण केल्याची घटना घाटीरोडवर घडली. यात म्हाडाचा कॉम्यूपटर ऑपरेटर जखमी झाला.
आहाद खान युनुस खान (रा पडेगाव) याच्यासह तीन अनोळखींवर बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल राजु पैठणे (वय 30 वर्षे, धंदा म्हाडा ऑफिस येथे कंम्प्युटर ऑपरेटर, रा. घाटी कॉर्टर) असे जखमी युवकाचे नाव आहे.
राहुल राजु पैठणे याने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, दिनांक 16/03/2023 रोजी रात्री 08.15 वाजेच्या सुमारास राहुल राजु पैठणे हा त्याच्या राहते घरातून मामा सुरेश सोनवणे (रा. जयभीमनगर टाउन हॉल) यांच्या घरी जात होता. राहुल राजु पैठणे हा घाटी रोडवरील जहागीरदार मज्जिद समोर असताना मकाईगेट कडून पांढऱ्या रंगाची मोपेडवर बसून दोघे आले.
त्यातील गाडी चालवणारा आहाद खान युनुस खान (रा पडेगाव) होता तर दुसरा अनोळखी होता. त्यांच्या गाडीचा धक्का राहुल राजु पैठणे याच्या उजव्या हाताला लागला. तेव्हा राहुल राजु पैठणे हा त्यांना म्हणाला की “तुम्ही गाडी हळुने चालवा ” तेव्हा ते दोघांनी शिवीगाळ करून वाद घातला.
तेवढ्यात त्यांचे आणखी दोन साथीदर आले ते सुद्धा ओळखीचे नव्हते. त्यांनी राहुल राजु पैठणे याचे हात पकडले व हाताचापटाने, लाथाबुक्याने मारहाण करु लागले. त्यानंतर आहाद खान याने खाली पडलेला दगड उचलून राहुल राजु पैठणे याच्या डाव्या डोळ्याच्या वर कपाळावर तसेच डाव्या बाजुला बरगडीवर मारल्यामुळे जखम झाली. त्यानंतर राहुल राजु पैठणे यास घाटीत दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी जखमी युवकाच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe







