सरपंच पती हनुमंत कोलते एका लाखाची लाच घेताना पकडला ! जिल्हा परिषदेच्या उपहारगृहातच अलगत अडकला लाचेच्या सापळ्यात !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २३- जल जीवन मिशन अंतर्गत सौर उर्जेंवर आधारित दुहेरी पंप लघुनळ योजनेचे काम थांबवून थांबवलेले काम पुन्हा सुरु करण्यासाठी तब्बल १ लाखाची लाच घेताना सरपंच पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपहार गृहात सरपंच पती लाचेच्या सापळ्यात अलगद अडकला.
हनुमंत पांडुरंग कोलते (वय 43 वर्षे, व्यवसाय शेती, सरपंच पती, रा. रोहकल, ता. परांडा, जिल्हा धाराशिव) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार हे मेनकर एनर्जी प्रा. लिमिटेड कंपनी मध्ये साईट सुपर वायझर म्हणून नेमणूकीस आहेत आणि कंपनीचे जल जीवन मिशन अंतर्गत सौर उर्जेंवर आधारित दुहेरी पंप लघुनळ योजनेचे 18,00,000/- (अठरा लाख रुपये) किमतीचे काम रोहकल, ता. परांडा येथील 3 वस्तीवर चालू आहे.
यातील आरोपी सरपंच पती हनुमंत पांडुरंग कोलते यांनी सदर योजनेचे काम थांबवून ते पूर्ववत चालू करू देण्यासाठी
यातील तक्रारदार यांना दिनांक 22/03/2023 रोजी चालू असलेल्या तीन्ही कामाचे प्रत्येकी 50,000/- रुपये प्रमाणे 1,50,000/- रुपये किंवा सोलरच्या तीन प्लेट व त्याचे साहित्य अशा लाचेची मागणी पंचांसमक्ष केली. तडजोडी अंती 1,00,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून आज दिनांक 23/03/2023 रोजी 1,00,000/- रुपये लाच रक्कम धाराशिव जिल्हा परिषद उपहार गृह येथे पंचांसमक्ष स्वीकारली. आरोपी सरपंच पती हनुमंत पांडुरंग कोलते यांना ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन आनंदनगर (धाराशिव) येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कारवाई छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, सापळा अधिकारी :- सिद्धाराम म्हेत्रे, पोलीस उपाधीक्षक धाराशिव, सापळा पथक – पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, इफ्तेकार शेख, सचिन शेवाळे, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe