महाराष्ट्र
Trending

भोकरदन: केदारखेडा ग्रामसेवक, सरपंचाची खोटी सही, शिक्के मारून कर्जासाठी श्रीराम सिटी फायनांसकडे केले दाखल !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २९ – कर्जासाठी ग्रामसेवक, सरपंचाची खोटी सही, शिक्के मारून सदर कागदपत्रे श्रीराम सिटी फायनांसकडे दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे हा प्रकार झाल्याने एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास मदत करणा-या अन्य एका जणाचा पोलिस शोध घेत आहे.

राजू सांडू जाधव (रा. केदारखेडा) असे आरोपीचे नाव आहे. संदिप रामचंद्र सपकाळ (वय 32 वर्षे व्यवसाय नौकरी ग्रामसेवक केदारखेडा रा. पुखराज नगर भोकरदन ता. भोकरदन जि.जालना) यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, दिनांक 06/09/2021 पासून केदारखेडा येथे ग्रामसेवक म्हणून काम करीत आहे. जागेचा नमुना नं. 8, फेरफार प्रमाणपत्र, गावठाण प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी पत्रक, जागेचा नकाशा, ना हारकत प्रमाणपत्र व अन्य दाखले गावातील व्यक्तीस आवश्यकता असल्यास ते तयार करून ग्रामपंचायती मार्फत देण्यात येतात.

एक महिण्यापूर्वी मौजे केदारखेडा येथील राजू सांडू जाधव हे ग्रामसेवक संदिप रामचंद्र सपकाळ यांच्याकडे नमुना 8 घेण्यासाठी आले होते. तेव्हा ग्रामसेवक संदिप रामचंद्र सपकाळ यांनी त्यांना जागेचा नमूना नं. 8 दिला होता. दिनांक 26/04/2023 रोजी दुपारी 01.00 वाजेच्या सुमारास मौजे बानेगांव येथील ग्रामसेविका यांचा फोन आला व त्यांनी ग्रामसेवक संदिप रामचंद्र सपकाळ यांना सांगीतले की, तुम्ही राजू सांडू जाधव (रा. केदारखेडा) यांना कर्जासाठी गावठाण प्रमाणपत्र व ईतर प्रमाणपत्र दिले आहे काय ? तेव्हा ग्रामसेवक संदिप रामचंद्र सपकाळ यांनी त्यांना सांगितले की, मौजे केदारखेडा गावातील व्यक्ती सदर प्रमाणपत्राची मागणी करीत होते.

परंतू कोणतेही गावठाण प्रमाणपत्र किंवा कर्जासाठी ईतर प्रमाणपत्र दिले नाही असे सांगितले व तुम्ही सुध्दा सदरचे प्रमाणपत्र देवू नका असे सांगितले होते. त्याचवेळी ग्रामसेवक संदिप रामचंद्र सपकाळ यांनी ग्रामसेविका यांना म्हणाले होते की तुमच्याकडे तशी काही कागदपत्रे असेल तर माझ्या व्हाटस्अपवर सेंड करा. त्यानंतर ग्रामसेवक संदिप रामचंद्र सपकाळ यांनी दिनांक 20/04/2023 रोजी नमूना नं. 8, फेरफार प्रमाणपत्र, गावठाण प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी पत्रक, जागेचा नकाशा, ना हारकत प्रमाणपत्र हे बघितले असता सदर कागदपत्रांवर ग्रामसेवक संदिप रामचंद्र सपकाळ यांच्या सारख्याच खोट्या सह्या केलेल्या दिसून आल्या तसेच ग्रामविकास अधिकारी ग्रुप ग्रा.पं. केदारखेडा / बामखेडा / मेरखेडा (ता. भोकरदन जि.जालना) असा शिक्का असताना ग्रामसेवक ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय केदारखेडा / मेरखेडा / बामखेडा / (ता. भोकरदन जि.जालना) असा बनावट शिक्का बनवून तो कागदपत्रांवर मारलेला दिसून आला आहे.

तसेच मौजे केदारखेडा येथील सरपंचाचा सुध्दा बनावट शिक्का बनवून तो श्रीराम सिटी फायनांस कर्जासाठी वापरलेला दिसून आला आहे. त्यानंतर ग्रामसेवक संदिप रामचंद्र सपकाळ यांनी राजू सांडू जाधव यांना फोन लावून विचारले की तुम्ही श्रीराम सिटी फायनांस मध्ये कर्ज घेण्यासाठी माझी खोटी सही करून व ग्रामसेवक नावाचे खोटे शिक्के तयार करून ते कागदपत्रांवरून मारून ते दाखल का केले ? असे विचारले असता ते मला म्हणाले की, मला तुम्हाला भेटायचे आहे असे म्हणून ते माझ्या घरी भोकरदन येथे आले व म्हणाले की, माझ्याकडून चुकी झाली आहे मी ते शिक्के गावातील एका व्यक्तीकडून शिक्के करून व स्वाक्षरी करून घेतली आहे. परंतू त्याने सदर व्यक्तीचे नाव सांगीतले नाही व तिथून ते निघून गेले.

याप्रकरणी ग्रामसेवक संदिप रामचंद्र सपकाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजू सांडू जाधव (रा. केदारखेडा) यांच्यावर भोकरदन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!