गंगापूरछत्रपती संभाजीनगर
Trending

देवगांव रंगारी हद्यीत घरफोडी करणारा गंगापूरचा चोरटा व चोरीचा माल घेणारा सराफा जेरबंद !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४- पोलीस ठाणे देवगांव रंगारी हद्यीत घरफोडी करून लाखोंचा ऐवज चोरून नेणारा चोरटा व चोरीचा माल घेणारा सराफा यास स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ३,३३,३६० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक ११/०४/२०२३ रोजी पोलीस ठाणे देवगांव रंगारी येथे फिर्यादी राजेंद्र मारोती सोनवणे (वय ५५ वर्षे रा. ताडपिंपळगांव ता. कन्नड जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली की, दिनांक ११/०४/२०२३ रोजी १०:३० ते १६:०० वा. चे दरम्यान अज्ञात चोरटयाने घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून आतील नगदी रुपये व सोन्याचे दागिणे असे एकूण ४,६२,०००/- रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. या फिर्यादीवरून पोस्टे देवगांव रंगारी येथे  गुन्हा दाखल झालेला आहे.

या गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून व तांत्रीक विश्लेषणा आधारे खात्रीलायक माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत गोरख ड्रायव्हर चव्हाण (वय ३० वर्षे रा. बाबरगांव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) याने केल्याच्या संशयावरुन त्यास ताब्यात घेतले.

विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याच्या साथीदारासह केल्याची कबुली देऊन त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिणे हे गंगापूर येथील दीपक कचरु दंडगव्हाळ (रा. समर्थ नगर, गंगापूर) यास विक्री केल्याचे सांगितले. त्यावरून दीपक कचरु दंडगव्हाळ (वय ४९ वर्ष रा. समर्थ नगर, गंगापूर, जि. औरंगाबाद) शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. विचारपुस केली असता त्याने सांगितले की, सुमारे १५ दिवसांपूर्वी गोरख ड्रायव्हर चव्हाण याच्याकडून सोने विकत घेतल्याची कबुली दिली.

सदर सोन्याचे दागिणे वितळून त्याची लगड बनुवून ठेवल्याचे सांगून सदरची सोन्याची ५२ ग्रॅम वजनाची ३,२१,३६० /- रुपयांची काढून दिल्याने सदरची लगड जप्त करण्यात आली आहे. तसेच आरोपी गोरख ड्रायव्हर चव्हाण याने गुन्हा करतेवेळी वापरलेला १२,००० /- रुपये किंमतीचा मोबाईल हँडसेट असा एकूण ३,३३,३६० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गोरख ड्रायव्हर चव्हाण याच्या फरार साथीदाराचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत आहेत.

आरोपीतांना सदर गुन्हयाच्या पुढील तपासकामी पोलीस ठाणे देवगांव रंगारी यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस ठाणे देवगांव रंगारी करीत आहे.

ही कामगिरी मनिष कलवानीया, पोलीस अधीक्षक, सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोउपनि विजय जाधव, सफौ बालू पाथ्रीकर, दगडू जाधव, पोह लहू थोटे, संतोष पाटील, संजय घुगे मपोह जनाबाई चव्हाण पोना नरेंद्र खंदारे, अशोक वाघ, पोकॉ रामेश्वर धापसे, संजय तांदळे, योगेश तरमाळे, जिवन घोलप मपोना कविता पवार यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!