एकनाथ शिंदे गटातील बरेच आमदार नाराज, त्यांचा असंतोष हळूहळू बाहेर येणार: जयंत पाटील
शरद पवार नाशिक, बीड, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करणार: जयंत पाटील
मुंबई, दि. ४ – एकनाथ शिंदे गटातील बरेच आमदार नाराज आहे. राष्ट्रवादीमुळे ज्यांनी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना सोडली. तीच कारणे पुन्हा त्यांच्या पुढे आणून ठेवली जात आहे. काहींना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार होती. त्यांच्याच जिल्ह्यात ज्यांना विरोध केला तेच कॅबिनेट मंत्री झाले. त्यामुळे अशांचा असंतोष हळूहळू पुढे येईल, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे उद्या, दुपारी १ वाजता पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थितांचा उत्स्फूर्त पाठींब्याने पवार साहेबांच्या मागे उभा असणारा वर्ग लक्षात येईल असा विश्वासही प्रदेधाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
आमची नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आहे तर अलीकडे महाराष्ट्रात नवीन झालेली नोशनल पार्टी आहे. नोशनल पार्टीने मला निलंबित केलं काय किंवा ठेवलय काय, मी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही मताला प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. सध्या केलेल्या कृतीचे समर्थन करणे त्यांना गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.
नाशिक, बीड, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यात शरद पवार स्वत: दौरा करणार- शरद पवार साहेब आमच्याच सोबत आहेत आणि आम्ही राष्ट्रवादीचेच आहोत असे सांगून लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न होत असला तरीही शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काल सातारा दौऱ्यात स्पष्ट केली आहे. थोड्याच दिसवात नाशिक, बीड, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यात पवार साहेब स्वत: दौरा सुरु करणार आहेत अशी माहिती प्रदेशाध्यक्षांनी माध्यमांसमोर मांडली. हा झंझावात नाशिक जिल्ह्यापासून सुरु होऊन महाराष्ट्रभर पवार साहेब फिरणार आहेत. हा दौरा लवकरच अधिकृतरीत्या जाहीर करण्यात येईल. साताऱ्यात ज्याप्रमाणे साहेबांचे स्वागत झाले तशाच प्रकारे राज्यात साहेबांचे स्वागत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या नाशिक जिल्ह्यातील कार्यालयात आज पवार साहेबांना समर्थन देण्यासाठी बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तशीच परिस्थिती नागपूर येथे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन बैठक घेतल्यास त्यात कोणतीही अडचण नाही. कोणी काही म्हणाले तरी शरद पवार साहेबांच्या आदेशाने मी प्रदेशाध्यक्ष झालेलो आहे. जोवर पवार साहेब या पदावरून बाजूला होण्याचा आदेश देत नाहीत तोवर मला बाजूला होण्याचा अधिकार नाही.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe