सिल्लोड
Trending

भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणीदार लाचेच्या जाळ्यात ! सिल्लोडच्या कार्यालयासमोरच घेतले ९५०० रुपये !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ७- मोजणीच्या हद्दखुणा मोजणी नक्कल देण्यासाठी ९५०० रुपयांची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील दुरुस्ती लिपीक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. सिल्लोड येथील कार्यालयाच्या समोरच त्यास लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

चंद्रशेखर राजाभाऊ अन्वीकर (वय ५० वर्ष, पद-दुरुस्ती लिपीक अति. पदभार भूमापक, नेमणूक- उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय सिल्लोड) असे आरोपीचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांचे मुळ गावी असलेल्या वडीलोपार्जीत जमिनीचे सात बारा प्रमाणे आरोपी अन्वीकर यांनी मोजणी केलेली होती. सदर मोजणीच्या हद्दखुणा मोजणी नक्कल तक्रारदार यांना उपलब्ध करून देण्यासाठी आरोपी अन्वेकर यांनी १५०००/- रुपये लाचेची मागणी करित असल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर कार्यालयात तक्रार दिली.

त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागतर्फे दि. 06/07/2023 रोजी सापळा आयोजीत केला. आरोपी अन्वीकर यांनी यापूर्वीच रुपये 5000/- स्वीकारलेले असून उर्वरीत रक्कम तडजोडीअंती 9500/- रुपये पंच साक्षीदारा समक्ष तक्रारदार यांचेकडून उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय सिल्लोड समोरील अंजिठा छत्रपती संभाजीनगर रोडवर परशुराम चौकात लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर लाचेच्या रक्कमेसह त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध पो.स्टे. सिल्लोड शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उप अधिक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांनी केली आहे. त्यांना सदर कारवाई कामी पो. अं. अशोक नागरगोजे, रविंद्र काळे, दत्तात्रय होरकटे चालक चंद्रकांत शिंदे यांनी मदत केली.

Back to top button
error: Content is protected !!