छत्रपती संभाजीनगर
Trending

प्रोझोन मॉलसमोरून मोटारसायकल चोरणारा युवक अटकेत ! जॉलीबोर्ड कंपनी समोर अडकला जाळ्यात, किलेअर्कमधून ७ दुचाकी जप्त !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ –  रेकॉर्ड वरील मोटारसायकल चोर पोलीस ठाणे MIDC सिडको येथील विशेष पथकाने जेरबंद केला. त्याच्या ताब्यातून १,७९,०००/- रुपये किंमतीच्या एकूण ७ मोटारसायकल जप्त करण्यात पोलिसांना यश आले. जॉलीबोर्ड कंपनीजवळ हा युवक पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ज्या दुचाकीवर संशयितरित्या तो आढळला ती दुचाकी त्याने प्रोझोन मॉलसमोरून चोरल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

दिनांक २३/०७/२०२२ रोजी पो.स्टे एम. सिडको भागात विशेष पथकाचे पोउपनि आत्माराम घुगे, रोहेको बापुराव बावस्कर, पोअं/प्रकाश सोनवने, पोअं/संतोष गायकवाड, पोअं/देविदास काळे, पीओ/ महानसिंग महेर पो अं/ अरविंद पुरी स्वतःच्या खाजगी वाहनाने पोलीस ठाणे MIDC सिडको हद्दीत पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी पोउपनि / आत्माराम घुगे, यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक युवक चोरीची मोटार सायकल घेवून जॉलीबोर्ड कंपनीजवळ विक्री करण्यासाठी येत आहे.

ही खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून पोउपनि / आत्माराम घुगे व वरील विशेष पथकाचे कर्मचारी यांनी तात्काळ सदर ठीकाणी जॉलीबोर्ड कंपनी समोर सापळा लावला. सदर युवक जॉलीबोर्ड कंपनी समोर संशय रित्या गाडीवर बसलेला आढळून आला. त्यास शिताफीने पकडून त्याचे नाव विचारले असता त्यांने त्याचे नाव- निरज उर्फ लड्डु नंदु बनकर (वय २० वर्षे रा. किलेअर्क, छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. त्यावरुन त्याच्या ताब्यात असलेली मोटार सायकल बाबत विचारणा केली असता त्याने सुरवातीला उडवा उडवीचे उत्तर दिले व नंतर सदरची मोटारसायकल ही त्याने प्रोझन मॉल समोरून चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्यास पो.स्टेला आणून अधिक विचारपुस केली असता त्यांने पो.स्टे एम. सिडको. पो. स्टे सिटीचौक व पो.स्टे जिन्सी या भागातून दोन ते तीन महिन्यांपूर्वी मोटारसायकल चोरी केल्याची कबूली दिली. एकूण ६ मोटार सायकल तो राहत असलेल्या किल्ले अर्क परिसरातून ताब्यात घेतल्या. त्यांच्या अभिलेखाची पाहणी केली असता पाच पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.  आरोपीस पो.स्टे. एम. सिडको यांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त  मनोज लोहीया, पोलीस उप आयुक्त शिलावंत नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सिडको विभाग साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक गोतम पातारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि आत्माराम घुगे, पोहेकॉ / बापुसाहेब बावस्कर , पोअं/प्रकाश सोनवने, पोअं/संतोष गायकवाड, पोअं/देविदास काळे, पोअं / महानसिंग महेर, पोअं/ नानासाहेब घोडके पोअं/ अरविंद पुरी यांनी पार पाडली.. पुढील तपास पोह बावस्कर करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!