तलाठी लाच घेताना चतुर्भुज: सुरुवातीला २५ हजार घेतल्याचा आरोप, जालन्याच्या शुभम झेरॉक्स सेंटर परिसरात १७ हजार घेताना रंगेहात पकडले !
संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – प्लॉटचा फेरफार करून देण्यासाठी १७ हजारांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. सुरुवातीला २५ हजार रुपये घेवूनही फेर केला नसल्याचा आरोप आहे. त्यानंतर १७ हजार रुपये घेताना तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आल्याने महसूल विभागातील भ्रष्ट्राचाराचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. जालन्याच्या शुभम झेरॉक्स सेंटर दुकान परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
शिवाजी आनंदराव घुगे (वय 54 वर्षे, पद – तलाठी, वर्ग – 3, सजा– इंदेवाडी, जालना. रा. माऊली नगर ,अंबड रोड जालना) असे आरोपीचे नाव आहे.
यातील तक्रारदार हे यांच्या मृत भाऊजी यांचे प्लॉटींगचा व्यवसाय सांभाळत आहे. सदर विक्री झालेल्या मौजे इंदेवाडी येथील गट क्रमांक 57 मधील 12 प्लॉटचा फेरफार करून देण्यासाठी यातील आरोपी शिवाजी घुगे यांनी पूर्वी 25000 रूपये स्वीकारले होते. परंतु पैसे घेऊन सुद्धा आरोपी तलाठी शिवाजी घुगे याने फेरफार करून दिला नाही. उलट मंडल अधिकारी काळे यांना प्रत्येक फेर साठी 5000 रू.प्रमाणे पैसे लागतील असे सांगितले. लाच पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी तलाठी शिवाजी घुगे याने 25000 रू. पंचा समक्ष शुभम झेरॉक्स सेंटर दुकान ,जालना येथे लाच मागणी करून तडजोड अंती 17000 रूपये स्वीकारण्याचे मान्य केले.
दि.22.8.23 रोजी सापळा कारवाई दरम्यान यातील आरोपी तलाठी शिवाजी घुगे याने साई भोजनालय येथे पंचा समक्ष 17000 रू. स्वीकारताना रंगेहाथ पकडले. आरोपी तलाठी घुगे यांचेकडून 17000 रू. लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपी तलाठी घुगे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाणे कदीम जालना जि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, जालना सापळा पथक – गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश बुजडे यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe