14 गुन्ह्यांतील वॉन्टेड गावठी कट्ट्यासह जेरबंद, जयहिंद साखर कारखान्याजवळ गंगापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
संभाजीनगर लाईव्ह, दि. ११- गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूस सोबत बाळगणारा सराईत पाहिजे असलेला आरोपी गंगापूर पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केला.
दिनांक 10/10/2022 रोजी रात्री 09:00 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले हे त्यांच्या पथकासह जामगाव परिसरात पेट्रालिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, गंगापूर पोलीसांना पाहिजे असलेला सराईत आरोपी महेश काशिनाथ काळे (रा. जामगाव ता. गंगापूर) हा त्याच्या गावी जामगाव येथे आला असून तो रात्रीच्या वेळी दारू पिण्यासाठी जयहिंद साखर कारखाना परिसरात पायी जात असतो. यावेळी त्याचे जवळ तो गावठी कट्टी जवळ बाळगतो.
या माहितीच्या आधारे पो.नि. सत्यजीत ताईतवाले व त्यांच्या पथकांने तात्काळ जामगाव च्या दिशेने धाव घेवून जयहिंद साखर कारखान्याच्या अलिकडे शेतात अंधारात आडोशाला सापळा लावला. यावेळी संशयित महेश काळे हा दबा धरून बसलेल्या पोलिसांच्या दिशेने येतांना नजरेस पडला. तो पाहिजे असलेला आरोपी महेश काळे असल्याची पोलिसांना खात्री होताच पोलिसांनी त्याच्या दिशेने धाव घेतली असता पोलीसांची हालचाल पाहताच महेश काळे यांने अंधाराचा फायदा घेत तो जिल्हा परिषद शाळेच्या दिशेने पळत सुटला. यावेळी पोलिसांनी त्याचा कसून पाठलाग करून त्याला थोडयाच अंतराव शिताफिने पकडले.
यावेळी त्याला विश्वासात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव महेश काशिनाथ काळे (वय 28 वर्ष रा.जामगाव ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला जवळ एक स्टिलच्या धातुचा काळया रंगाचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस (राऊंड ) अवैधरित्या विनापरवाना जवळ बाळगतांना मिळून आला. गावठी कट्टा व काडतुस जप्त करण्यात आली आहेत. आरोपी विरूध्द आतापर्यत प्राणघातक हल्ला करणे, चोरी, दरोडा, मारहाण, अवैध शस्त्र बाळगणे, विक्री करणे इत्यादी सारखे 14 गंभीर गुन्हे दाखल असून यापैकी 04 गंभीर गुन्हयात तो गंगापूर पोलिसांना पाहिजे होता.
त्याचे विरूध्द पोलीस ठाणे गंगापूर येथे कलम 3,25 भारतीय हत्यार कायद्यान्वये* गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गंगापूर पोलिस करित आहेत.
ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक, वैजापूर चार्ज, उपविभागीय पोलीस अधिकारी, गंगापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजीत ताईतवाले, पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार दिनकर थोरे, अमोल कांबळे, अभिजीत डहाळे, अतुल भवर, विजय नागरे, राहुल वडमारे, तेनसिंग राठोड, यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe