गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या तोडफोड प्रकरणी फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे अटकेत !
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – मराठा आरक्षणाच्या विरोधात सातत्याने गरळ ओकणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांच्यासह तिघांना मुंबईतील परळ पोलिसांनी अटके केली. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरातील घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले होते. आज, २६ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास ही गाड्यांची तोडफोड करण्यात आली.
मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने लाखोंचे मोर्चे काढणार्या मराठा समाजाची देशानेच नव्हे तर जगाने दखल घेतली. ५६ मोर्चेांदरम्यान कुठलीही हिंसा न करता मराठा समाजाने मोर्चाचा एक आदर्श जगासमोर घालून दिला. अशा या मराठा समाजाला वर्षानुवर्षे मागणी करूनही आरक्षण मिळात नसल्याने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत काल, २५ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.
दरम्यान, आज, २६ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी ही तोडफोड केल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरातील घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा आंदोलक देत होते आणि गाडी फोडत होते.
दरम्यान, गाड्यांची तोडफोड घडताच सदावर्ते यांच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. फोडलेल्या गाड्या पोलिसाांनी भोईवाडा पोलिस स्टेशनला लावल्या आहेत. तेथे गाड्यांची पाहणी व चौकशीची प्रक्रिया पार पाडली. दरम्यान, सरपंच मंगेश साबळे यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती त्यांच्या सोशल मीडिया अकाउंडवरून देण्यात आली आहे.
गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे करतात अनोखे आंदोलन…
अनोखे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी फुलंब्री तालुक्यातील गेवराई तालुक्याचे सरपंच मंगेश साबळे सध्या चर्चेत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल राज्य व देशपातळीवरील प्रसारमाध्यमांत घेतली. विहिर अनुदान घोटाळ्याचा पर्दाफाश करून फुलंब्री पंचायत समिती कार्यालयासमोर नोटांची उधळन करून वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेले फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी वेगळे आंदोलन करून सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
फुलंब्री तालुक्यातील पाल फाट्यावर गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळेंनी स्वत:ची कार पेटवून मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा काल केला होता निषेध – मंगेश साबळे यांनी ३ सप्टेंबर रोजी वेगळे आंदोलन करून सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले होते. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान न करता त्यांनी स्वतहाच्याच कारला इंधन ओतून पेटवून दिले. याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात टरबूज फोडून प्रतिकात्मक तिरडी आंदोलन काढण्यात आले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe