महाराष्ट्र
Trending

माजलगाव नगर परिषदेतील कर्मचारी घाबरून वाचवा वाचवा ओरडू लागले, धुराचे लोट पाहून महिला कर्मचारी बेशुद्ध पडली ! दगड, विटा, काठ्या घेवून जमाव आत घुसला, जोळपोळ अन् तोडफोडीची लिपिकाने सांगितली आपबीती !!

मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी बिगर मराठा आंदोलनात घुसल्याचा मराठा समाजाचा आरोप

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ – माजलगाव नगर परिषदेवरील हल्ल्याने राज्यातील प्रशासकीय वर्गात एकच खळबळ उडवून लावली. जवळपास १५० ते २०० जणांचा जमाव माजलगाव नगर परिषदेवर चालून गेला. दगड, विटा, काठ्या घेवून ५० जण आत घुसले. त्यांनी तोडफोड सुरु केली. यातील काही जणांनी खालच्या मजल्याला आग लावली. धुराचे लोट पाहून कर्मचारी घाबरून वाचवा वाचवा ओरडू लागले. यातच धुराचे लोट पाहून महिला कर्मचारी बेशुद्ध पडली. त्यानंतर जमाव निघून गेल्याने स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने नगर परिषदेतील कर्मचार्यांची सुटका झाली. लिपिकाने पोलिसांना सांगितली आपबीती अंगावर शहारे आणनारी आहे. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाला जाणून बुजून बदनाम करण्यासाठी काही जणांनी षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. या जमावात बिगर मराठा होते, असेही त्यांचे म्हणने आहे. पोलिस याचा तपास करत आहे.

सुधाकर रामभाऊ ऊजगरे (वय 51 वर्षे व्यवसाय नौकरी रा. इंदिरानगर माजलगाव ता. माजलगाव जि.बीड) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार ते नगर परिषद माजलगाव येथे तीस वर्षांपासून नगर परिषदमध्ये लिपिक या पदावर कार्यरत आहे. दि. 30/10/2023 रोजी दुपारी 02.00 ते 02.15 वाजेच्या सुमारास नगर परिषद मधील कर्मचारी विमल शंकरराव मोरे, छाया दहिवाळ, मीरा रांजवन, शिवाजी होके आदी कार्यालयात नेहमीप्रमाणे काम करीत होते.

याचवेळी अचानक बाहेरून लोकांचा मोठा आवाज आला म्हणून कर्मचारी उभे राहिले असता जमावातील काही लोकांच्या लोंडाला मास्क बांधलेले होते. दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव होता. त्या मधील अंदाजे पन्नास ते साठ लोक नगर परिषदमध्ये घुसले त्यांच्या हातामध्ये दगड, विटा, लाकडी काठ्या होत्या. त्यांनी आतमध्ये घुसून सामानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. बराच वेळ त्यांनी खालच्या मजल्यावर तोडफोड केली.

नंतर त्यांनी थोड्या वेळाने दुसर्या मजल्यावर येऊन सामानाची तोडफोड केली. सर्व दोन्ही मजल्यावर सामानाची तोडफोड करून जाताना त्यांनी खालच्या मजल्यावर आग लावली आणि ते रोडवर उभा राहिले. थोड्या वेळाने धुराचा लोट वर आल्यावर नगर परिषदेतील कर्मचारी घाबरून वाचवा वाचवा ओरडू लागले. जमाव रोडवर उभा राहून कर्मचार्यांना म्हणाला की, तुम्हाला आता जिवच जाळून मारायचे आहे. तुम्ही आता वाचनार नाहीत, तुम्हाला पळायला जागा कोठे नाही.

त्यावेळेस नगर परिषदेतील लिपिक उजगरे यांनी कार्यालयीन अधिक्षक गणेश डोंगरे यांना फोन करून झालेला प्रकार सांगितला. ते फोनवर म्हणाले तुमचा जिव कसातरी वाचवा मी ताबडतोब तुमच्याकडे येतो. फोन ठेवताच तेवढ्यात खालच्या मजल्या वरून धुराचा लोट मोठा झाला होता. महिला कर्मचारी छाया दहिवाळ या घाबरून बेशुध्द पडल्या. नंतर थोडावेळ जमाव थांबला व तेथून निघून गेला. नंतर स्थानिक नागरिक व पोलिस स्टेशनचे दंगल पथकातील कर्मचारी आले.

त्यांनी नगर परिषदच्या बाजुचा बांधकामावरील बोरच्या पाण्याचा पाईप घेऊन कॅबिन मधील आग विझवली व तिसर्या मजल्यावर ते सर्वजण आले व त्यांनी कर्मचार्यांना खाली आणले. खालच्या मजल्याची पाहणी केली असता जमावाने संगनक, प्रिंटर, टेबल, खुर्ची, काचेच्या खिडक्या सिसिटिव्ही कॅमेरे ए सी लाईट बोर्ड इत्यादी वस्तूंची तोडफोड करून जाळले होते, व काही संचिका फाडून टाकल्या होत्या. नगर परिषदेतील अंदाजे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी माजलगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!