छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र
Trending

छगन भुजबळांच्या पाहुण्यांचं हॉटेल त्यांच्याच कार्यकर्त्यांनी फोडलं ! महाराष्ट्रातील ५ ते १० हजार मराठ्यांच्या पोरांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं काही ओबीसी नेत्यांचं षडयंत्र, मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप !!

उद्रेक करणार्यांना अटक करू नका, असं आमचं म्हणनं नाही, अर्थाचा गैरअर्थ काढू नका पण शांततेत आंदोलन करणार्या आंदोलकांना अडकवू नका- जरांगे पाटील

Story Highlights
  • मराठ्यांनी आणखी ज्यास्तीची एकजूट वाढवा पण शांततेच्या मार्गाने- मनोज जरांगे पाटील
  • भुजबळ साहेबांनी मराठा समाजावर इतका आकस व्यक्त करू नये, अशी विनंतीही जरांगे पाटलांनी जाहीर व्यक्त केली.

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ – मला रात्री एक माहिती अशी मिळाली की, जर ती खोटी असेल तर मी माझे शब्द मागे घेईल. बीडचे काही बांधव इथे आले होते. त्यांनी असं सांगितलं छगन भुजबळ साहेबांच्या पाहुण्यांचं जे हॉटेल फोडलं ते त्यांच्याच पोरांनी फोडलंय आणि ते अटकसुद्धा आहे. अशी मला खात्रीलायक माहिती मिळाली. महाराष्ट्रातील ५ ते १० हजार मराठ्यांच्या पोरांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं काही ओबीसी नेत्यांचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत केला. उद्रेक करणार्यांना अटक करू नका, असं आमचं म्हणनं नाही, अर्थाचा गैरअर्थ काढू नका पण शांततेत आंदोलन करणार्या आंदोलकांना अडकवू नका असेही जरांगे पाटील म्हणाले. भुजबळ साहेबांनी मराठा समाजावर इतका आकस व्यक्त करू नये, अशी विनंतीही जरांगे पाटलांनी जाहीर व्यक्त केली.

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. आज, ७ नोव्हेबर रोजी सकाळी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत काही ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप केला. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, रात्री मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला होता. बघूयात उद्यापर्यंत वाट. सरकार झुलवतंय असं बोललं जातं. परंतू एवढं सोप नाही ते. त्यांनी तसं कारणही सांगितलं की, मुख्यमंत्री साहेब श्रीनगरला गेले म्हणून आम्ही ८ नोव्हेंबर रोजी येतो. तोपर्यंत वाट बघू. त्यानंतर पुढील भूमीका जाहीर करण्यात येईल.

त्यांच्यातल्या (ओबीसी) फक्त दोन तीन जणांनी असं ठरवलेलं दिसतं की मराठ्यांचं कल्याण होवू द्यायचं नाही- त्यांच्याबद्दल (छगन भुजबळ) मला काही सांगायचं पण नाही आणि म्हणायचंपण नाही. त्यांचा प्रश्न त्यांच्याजवळ आहे. परंतू मराठा समाजाला मी जाहीर आवाहन करतो की, आपल्या मराठा समाजाच्या गोर गरिबांच्या लेकरांचं कल्याण होतय. त्यांच्यातल्या फक्त दोन तीन जणांनी असं ठरवलेलं दिसतं की मराठ्यांचं कल्याण होवू द्यायचं नाही. यासाठी मराठ्यांनी आणखी ज्यास्तीची एकजूट वाढवा पण शांततेच्या मार्गाने. याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वपक्षिय मराठ्या नेत्यांना विनंती त्यांनी केली. जाणून बुजून षडयंत्र रचलं जातय याचं कारण असं की, जे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे महाराष्ट्रातील आपले गोर गरिबांचे पोरं आहेत यांना विनाकारण खोट्या केसेसमध्ये अडकवलं जात आहे. याकडे मराठ्यांच्या नेत्यांनी लक्ष ठेवावं. कारण उद्या तुम्हाला त्या पोरांची गरज आहे एवढं लक्षात ठेवा. नसता तुम्ही जर मदत नाही केली तर ते महाराष्ट्रातील मराठ्यांचे पोरं तुम्हाला कधीच माफ करणार नाही.

जर मला मिळालेली माहिती खोटी असेल तर मी माझे शब्द मागे घेईल- षडयंत्र काय आहे हे सांगतो. मला रात्री एक माहिती अशी मिळाली की, जर ती खोटी असेल तर मी माझे शब्द मागे घेईल. बीडचे काही बांधव इथे आले होते. त्यांनी असं सांगितलं छगन भुजबळ साहेबांच्या पाहुण्यांचं जे हॉटेल फोडलं ते त्यांच्याच पोरांनी फोडलंय आणि ते अटकसुद्धा आहे. अशी मला खात्रीलायक माहिती मिळाली. म्हणजे मी याच्याअगोदर म्हटलो होतो, मराठे शांततेत आंदोलनं करत आहेत. याच्यात सत्ताधार्यांचेच लोकं आमच्या मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. शक्यतो ते तंतोतंत खरं व्हायला लागलंय.

हॉटेल त्यांच्याच समाजातील कोणीतरी जवळच्यांनी फोडल्याची ऐकीव माहिती – छगन भुजबळ साहेबांच्या पाहुण्यांचं हॉटेल त्यांच्याच समाजातील कोणीतरी जवळच्यांनी ते फोडलंय अशी जी मला ऐकीव माहिती मिळाली. त्याचबरोबर महाराष्ट्रातही असा अंदाज दिसतोय यांनी एकामेकांचे पूर्वीच्या द्वेषापोटी घरं फोडले. एकमेकांच्या घरांवर दगड मारले. हे जे काही मी मागे म्हटलो होतो हे शक्यतो सत्य होणार आहे. मराठ्यांच्या लोकांना जाळपोळीशी देणं घेणं नाही. आणि त्यांना जाळपोळ करायचीपण नाही. मराठ्यांच्या लोकांना जे सांगितलय की आपण शांततेत साखळी आणि आमरण उपोषण करायचं आहे ते तसेच सुरु आहे. मराठ्यांना या असल्या गोष्टींशी काहीही देणं घेणं नाही. मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळावं म्हणून शांततेत आंदोलन सुरु आहे.

Back to top button
error: Content is protected !!