महाराष्ट्र
Trending

भडगावसह रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, जळगाव व पाचोरा या तालुक्यांतील शेतकऱ्यांना ३.२५ कोटी रुपये अनुदान मंजूर !

भडगाव तालुक्यासह इतर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत

मुंबई,दि.१०: भडगावसह रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, जळगाव व पाचोरा या तालुक्यांतील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकूण ३८५६ बाधीत शेतकऱ्यांना ३.२५ कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्तीमधील बांधितांना मदत देण्याकरिता मंत्री मदत व पुनर्वसन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत दि. ११ जून २०१९ रोजी वादळी पावसामुळे भडगावसह रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, जळगाव व पाचोरा या तालुक्यांतील शेतपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी अनुदान मिळणेबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रस्ताव सादर केला.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने ३.२५ कोटी रुपये अनुदान मंजूर करणेबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एकूण ३८५६ बाधीत शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!