राजकारण
Trending

अजित पवारांनी संघटनेत कधीच पद घेतले नव्हते, ते कायम सत्तेच्या वर्तुळात राहिले ! सत्ता मिळत नसल्यास ते दुसरीकडे झुकले, हा इतिहास: वकील देवदत्त कामत यांचा जोरदार युक्तीवाद

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची Xवर माहिती

मुंबई, दि. २७ – “अजित पवार यांनी संघटनेत कधीच पद घेतले नव्हते. ते कायम सत्तेच्या वर्तुळात राहिले. सत्ता मिळत नसल्यास ते दुसरीकडे झुकले, हा इतिहास आहे, असा युक्तीवाद नुकत्याच झालेल्या निवडणूक आयोगातील सुनावणीत वकील देवदत्त कामत यांनी केला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी Xवर दिली.

माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यासंदर्भात म्हणाले की, मागील एका सुनावणीत अजित पवार गटाच्या वकिलांनी शरदचंद्र पवारसाहेब हे उपस्थित असताना ते पक्षात हुकूमशहासारखे वागत असून पक्षात लोकशाही नसल्याचा आरोप केला होता. या आरोपावर आम्ही लगेच बाहेर येऊन माध्यमांसमोर या आरोपांचे खंडन करून सत्य वस्तुस्थिती जाहीरपणे सांगितली होती.

नुकत्याच झालेल्या निवडणूक आयोगातील सुनावणीत आमचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तीवाद करताना , “अजित पवार यांनी संघटनेत कधीच पद घेतले नव्हते. ते कायम सत्तेच्या वर्तुळात राहिले. सत्ता मिळत नसल्यास ते दुसरीकडे झुकले, हा इतिहास आहे. सन 2019 आणि 2023 मध्येही त्यांची अशीच वर्तुणूक होती. २०१९ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेतही त्यांनी पक्षावर दावा केला होता; म्हणजेच त्यांची वागणूक ही सत्तेकडेच वळणारी आहे”, असे सविस्तर सांगितले. त्यावर शरद पवार विरोधी गटाने बाहेर येऊन वकील कामत यांचे म्हणणे खोडून काढले नाही. जसे शरद पवार साहेबांवरील हुकूमशहाचे आरोप आम्ही तत्काळ खोडून काढले. तसे या विरोधकांनी केले नाही.

त्यानंतर आत माझ्यावर टीका करण्यात येत आहे. वास्तविक पाहता, हे मुद्दे वकील देवदत्त कामत यांनी मांडलेले आहेत. मी कुठे ही अजित दादांचे पक्षासाठी योगदान नाही असे मी म्हंटले नाही.

मला पक्षातील पदे आणि मंत्रिपद हे फक्त शरद पवारसाहेबांमुळेच मिळालेले आहे. माझी १००टक्के निष्ठा ही पवारसाहेबांप्रतीच आहे. त्यामुळेच पवारसाहेबांनी मला ही पदे दिली असल्याचे मी जाहीरपणे आणि छातीठोकपणे कबूल करीत असतो. मला पवारसाहेबांपर्यंत सुरेश कलमाडी आणि डाॅ. पद्मसिंह पाटील यांनीच नेले होते, हेही मी सांगत असतो; मी खोटं बोलत नाही. उगाच बातम्यांमध्ये येण्यासाठी खोटे आणि चुकीचे बाईट देऊ नका. सत्यापासून दूर जाणारा मी नाही. मला मदत करणाऱ्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरत नाही, असेही जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना एक्स या सोशल माध्यमावर व्यक्त केल्या.

Back to top button
error: Content is protected !!