धाराशिव, परभणीसह महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७६५ सहायक प्राध्यापक पद भरती ! खंडपीठाच्या आदेशानंतर एमपीएससी मार्फत प्रक्रियेस प्रारंभ !!
खासदार जलील जनहित याचिकेत हायकोर्टाने शासनाला वैद्यकीय रिक्त पदे भरण्याचे दिले होते आदेश, जाहिरात प्रसिद्ध
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ : खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिका क्र. ४७/२०२१ मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अमलबजावणी करून शासनाने महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवे अंतर्गत विविध विषयातील सहायक प्राध्यापक गट-ब संवर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण ५८० पदे आणि नव्याने स्थापन झालेल्या धाराशिव, अलिबाग, सिंधुदुर्ग, नंदूरबार, परभणी व सातारा या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण १८५ पदे असे एकूण ७६५ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत जाहिरात प्रसिध्द केली आहे.
महाराष्ट्रातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, गट-ब संवर्गातील एकूण ५८० रिक्त पदे भरण्याकरिता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविले आहे. ज्यामध्ये फॉरेन्सिक मेडिसिन (२०), फिजिओलॉजी (२४), अॅनाटॉमी (१५), रेडिओ-डायग्नोसिस / रेडिओलॉजी (५४), पॅथॉलॉजी (५५), मायक्रोबायोलॉजी (१९), ट्युबरकोलोसिस अॅण्ड चेस्ट डायजिसस् (१९), रेडिओथेरापी (०५), जनरल सर्जरी (४५), डरमॅटोलॉजी (१४), पेडियाट्रिक्स (२१), प्रिवेन्टीव अॅण्ड सोशल मेडिसिन (२८), फारमाकोलॉजी (२७), ऑरथॉपेडिक्स (१६), सायकेट्री (१४), ईएनटी (०७), ऑप्थलमोलॉजी (०६), अॅनस्थिओलॉजी (४७), बायोकेमिस्ट्री (२१), ऑबस्ट्रिटीक्स अॅण्ड गायनोलॉजी (४०), जनरल मेडिसिन (८३) अशा विविध संवर्गातील सहायक प्राध्यापक पदांचा समावेश आहे.
तसेच महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग (२९), धाराशिव (३४), सिंधूदुर्ग (३०), नंदुरबार (३९), परभणी (२२) आणि सातारा (३१) अस एकूण १८५ सहायक प्रध्यापक पदांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने सहायक प्राध्यापक, गट-ब पद भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात प्रसिध्द करुन त्यामध्ये परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त तपशीलावार माहिती दिली आहे.
दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी १४.०० ते दिनांक ०१ जानेवारी २०२४ रोजी २३.५९ या विहित कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच स्वीकारण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया इत्यादीबाबत सविस्तर तपशिलासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in अथवा https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना मध्ये उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
जाहिरातीमध्ये विहीत केलेल्या अटी, शर्तीची पूर्तता करणार्या उमेदवारांनी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीव्दारे अर्ज सादर करण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.
राज्यातील कोरोना महामारीच्या संदर्भात औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठामध्ये जनहित याचिका क्र. ४७/२०२१ दाखल केली होती. विशेष म्हणजे खासदार इम्तियाज जलील हे स्वत: व्यक्तिश: न्यायालयात त्यांची बाजु मांडून युक्तिवाद करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe