छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

वैजापूर, रोटेगाव, पैठण परिसर पिंजून काढला अखेर रेल्वेस्टेशन परिसरातून ताब्यात घेतले ! साडेतीन लाखांच्या मुद्देमालासह चोरटे जेरबंद !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २४- वैजापूर, रोटेगाव, पैठण परिसर पिंजून काढला अखेर रेल्वेस्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. सा़डेतीन लाखांच्या मुद्देमालासह चोरटे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. पोलीस ठाणे जवाहरनगर येथील गुन्ह्यातील सि ए महिलेला लुटणारे आरोपी सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलीस ठाणे जवाहरनगर गुन्ह्यातील फिर्यादी महिला यांनी तक्रार दिली होती की, दि. 16/08/2024 रोजी सकाळी 06.45वा सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरी वॉचमन सुनील उर्फ स्वदेश शिंदे याने त्याच्या दोन साथीदारसोबत चाकुचा धाक दाखवून त्यांच्या कडील सोन्याचे व हि-याचे दागिने, दोन महागडे मोबाईल असा एकूण-3,50,000/- किंमतीचा ऐवज चोरी केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हाच्या घटनास्थळी प्राप्त सिसिटीव्हीच्या आधारे तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपीचा वैजापूर, रोटेगाव, पैठण आदी भागात शोधाशोध केला परंतु आरोपी हा त्याचे वास्तव्य बदलत फिरत होता. त्यामुळे सदर गुन्ह्यातील आरोपी शोध घेणे चॅलेजिंग बनले होते, तरी गुन्ह्यातील सर्व प्रथम आरोपी भीमा बबन साळवे, वय-20 वर्षे, राह-मुंकुदवाडी, यास दि.21/08/2024 रोजी हिनानगर चिकलठाणा येथून ताब्यात घेतले.

तसेच मुख्य आरोपी वाचमन सुनील उर्फ स्वदेश सर्जेराव शिंदे, वय-26 वर्षे, राह-संजयनगर, ता. जि. छत्रपती संभाजीनगर यास दि.24/08/2024 रोजी रेल्वेस्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. सदर गुन्ह्यामध्ये एक विधी संघर्षित बालक सुध्दा सहभागी आहे. सदर आरोपीकडून गुन्ह्यात एकूण रु.- 03,85,000/- एवढा मुदेदमाल गुन्ह्यातील वापरलेले वाहन MH 20 ED 4172 ताब्यात घेण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त प्रविण पवार साहेब, पोलीस उपायुक्त परि-०२, नवनित कॉवत, सहा. पोलीस आयुक्त रणजित पाटील, उस्मानपुरा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर, विशेष पथकाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे, सफो/शिंगाने, पोह क्षीरसागर, पोह पवार, पोअं काळे, पोअं वनकर, पोअं खिल्लारे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!