पैठण

नेहमी मोबाइलवर शुभमशी बोलायची…मध्यरात्री गायब झाली १६ वर्षांची मुलगी!; पैठणची घटना

पैठण, दि. १३ ः पैठणच्या जायकवाडी उत्तर भागातून १६ वर्षीय मुलीच्या अपहरणाची घटना समोर आली आहे. तिच्या वडिलांनी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो पिंपळवाडीचा रहिवासी आहे.

अपहरण झालेली मुलगी जायकवाडीच्या एका विद्यालयात दहावीत शिकते. १० डिसेंबरला मध्यरात्री (पहाटे) दोनला मुलीचे काका लघुशंकेसाठी उठले असता त्यांना घराचे दार उघडे दिसले. त्यांनी सर्वांना उठवले असता मुलगी घरात दिसली नाही. त्यामुळे तिचा शोध सुरू करण्यात आला.

नातेवाइकांकडेही तपास करण्यात आला. मैत्रिणींकडे विचारपूस करण्यात आली. पण ती मिळून आली नाही. तिचा मोबाइलही बंद दाखवत आहे. काही दिवसांपूर्वी या मुलीला पिंपळगावच्या शुभम नावाच्या मुलासोबत बोलताना तिच्या घरच्यांनी पकडले होते. त्यावेळी आई-वडिलांनी तिला समजावून सांगितले होते.

मुलगी गायब झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी शुभमचे घर गाठले असता शुभमही गायब असल्याचे समोर आले. त्यामुळे त्‍याच्याविरुद्ध फूस लावून पळवल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली. पोलीस आता दोघांचा शोध घेत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!